भारतीय खेळाडू कॉमनवेल्थसाठी सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |



पुणे : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ खेळांना आजपासून सुरूवात होते आहे. पूर्वी ब्रिटीश राजवट असलेले देश ह्या स्पर्धेत प्रामुख्याने भाग घेतात. दर चार वर्षांनी खेळली जाणारी ही स्पर्धा ह्या वर्षी ऑस्ट्रलियामध्ये होणार आहे. यासाठीचा भारतीय संघ ऑस्टेलियामध्ये पोहोचला असून सर्व भारतीय खेळाडू भरघोस पदके मिळविण्यासाठी सज्ज आहे.

५३ देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेत जिमनॅस्टिक, स्वॅश, स्विमिंग, अॅथलॅटिक्स, बॅडमिंटन, मुष्टीयुध्द असे विविध खेळ खेळले जाणार आहेत.


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये ते म्हणतात की, कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा. तुम्ही घेतलेले अपार कष्ट सिध्द करण्याची हीच वेळ आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@