मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

२०१७ मध्ये मोबाईल हॅण्डसेट उत्पादनात भारताचा वाटा १७ टक्के
२०१९ पर्यंत भारताचे ५० कोटी मोबाईल तयार करण्याचे लक्ष्य


भारत हा चीननंतर दुसर्‍या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनलेला आहे. भारत सरकार व इंडियन सेल्युलर असोशिएशन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी भारताने हे यश मिळविले आहे. २०१७ मध्ये मोबाईल हॅण्डसेट उत्पादनात भारताचा वाटा १७ टक्क्यांपर्यंत वाढलेला होता. २०१४ मध्ये तो अवघा ३ टक्के इतकाच होता. या उत्पादनवाढीमुळे आयात होणार्‍या मोबाईल हॅण्डसेट्सची संख्या घटत चाललेली आहे तर निर्यात वाढू लागली आहे.
 
 
येत्या २०१९ पर्यंत भारताने ५० कोटी मोबाईल फोन निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यांची किंमत ४६ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी राहणार आहे. तर निर्यातीसाठीचे १२ कोटी मोबाईल फोन युनिटचे लक्ष्य ठरविले आहे. त्याची किंमत सुमारे १५ लाख डॉलर इतकी असेल.
 
 
मोबाईल निर्मितीतील भारताची ही झेप कौतुकास्पद म्हणावी लागेल. तरीही देशाला चीन, व्हिएतनाम, जपान या सारख्या देशांच्या स्पर्धेला तोंड द्यायचे आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@