भारताकडून २२५ खेळाडूंचा कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या कॉमनवेल्थ खेळांना आजपासून सुरूवात झाली आहे. भारताकडून यावर्षी या खेळांमध्ये २२५ खेळाडू भाग घेणार आहेत. ५३ देश या स्पर्धेत सहभागी होत असून या स्पर्धेत जिमनॅस्टिक, स्वॅश, स्विमिंग, अॅथलॅटिक्स, बॅडमिंटन, मुष्टीयुध्द असे विविध खेळ खेळले जाणार आहेत.
 
 
भारताची स्टार बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, नेमबाज मनु भाकर, मुष्टियोद्धा मेरी कॉम, मुष्टियोद्धा साक्षी मलिक, मुष्टियोद्धा सुशील कुमार, मुष्टियोद्धा विनेश फोगाट, बॅटमिंटनपटू सायना नेहवाल, बॅटमिंटनपटू के. श्रीकांत, नेमबाज हीना सिंधू, नेमबाज जितु राय सहित २२५ खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत.
 
 
 
भारतीय खेळाडूंनी मागील काही वर्षांमध्ये खेळाचे अतिशय उत्तम प्रदर्शन सादर केले असल्याने यावर्षी भारतीय खेळाडूंकडून खूप अपेक्षा बाळगली जात आहे. भारतातील नागरिकांनी या २२५ खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@