नागपूर दीक्षाभूमीच्या विकासासाठी १०० कोटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |
 
 
 
मुंबई : नागपूरमधील दीक्षाभूमीच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच अन्य ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वांच्या स्थळांचा विकासासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी दिली.
 
दीक्षाभूमीसह कामठी येथील ड्रॅगन पॅलेस तसेच ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र उभारणे, परळमध्ये संत रोहिदास भवन उभारणे आदी विविध कामांसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. नागपूरमधील दीक्षाभूमीसाठी देण्यात येणा-या १०० कोटी रूपयांपैकी ४० कोटी ड्रॅगन पॅलेससाठी मंजूर करण्यात आलेल्या २५ कोटींपैकी १५ कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच परळ येथील संत रोहिदास भवन इमारत बांधकामासाठी ११ कोटी १२ लाख ५१ हजार, ठाणे जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक व सांस्कृतिक केंद्राच्या बांधकामासाठी ८ कोटी १ लाख ७० हजार, स्वयंसेवी संस्थांना अनुदान म्हणून २ कोटी ९८ लाखांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
 
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती
दीक्षाभूमी, ड्रॅगन टेम्पल पॅलेसच्या विकास कामांसाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दीक्षाभूमीसह विविध ऐतिहासिक स्थळांच्या विकास कामासाठी मंजूर केलेल्या निधीमध्ये शासनाचा 90 टक्के तर संबंधित संस्थेचा 10 टक्के सहभाग असणार असणार असल्याचे बडोले यांनी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@