काबुलमध्ये दोन ठिकाणी आत्मघातकी हल्ले, वीस जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
अफगाणीस्थान : अफगाणीस्थानमधील काबुलमध्ये आज दोन ठिकाणी आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. या दोन्ही हल्ल्यात मिळून २० नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी सध्या मिळत आहे. तर ३० नागरिक जखमी झाले असल्याची बातमी सध्या मिळत आहे. मरणाऱ्या नागरिकांमध्ये जास्त मीडिया आणि पत्रकार संबंधी लोक होते अशी माहिती सध्या मिळत आहे. जखमी नागरिकांवर रुग्णालयात उपचार केले जात आहे. 
 
 
 
पहिला हल्ला शसदरक भागातील एनडीएस इंटेलिजन्स सर्विस कार्यालयाजवळ झाला तर दुसरा हल्ला तेथील पत्रकार आणि मीडिया कर्मचाऱ्यांवर झाला. यामुळे या हल्ल्यात पत्रकार आणि मीडिया कर्मचारी जास्त जखमी झाले. पहिला हल्ला झाल्यावर पत्रकार कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, हा हल्ला कसा झाला हे लोकांपर्यंत पोहोचायला नको या उद्देशाने हल्ला करणाऱ्यांनी पत्रकार कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला केला. 
 
 
 
 
या हल्ल्याची जबाबदारी सध्या अजून कोणी घेतलेली नाही. त्यामुळे हा हल्ला कोणी केला याचा शोध सध्या घेतला जात आहे. तालिबानी संघटनेने हा हल्ला केला असावा असा तेथील पोलिसांचा अंदाज आहे. मात्र अद्याप हल्ल्याचे कारण समजले नसल्याने शोध जोरात घेतला जात आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@