जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |


नवी दिल्ली : देशभरातील इंजिनिअरींग कॉलेजच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक बोर्डने (सीबीएसई) नुकताच काही वेळापूर्वी आपल्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला असून आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील सूरज कृष्णा या विद्यार्थाने या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सीबीएसईने आपल्या http://cbseresults.nic.in/ या संकेतस्थळावर निकालांची घोषण केली आहे. या संकेतस्थळावर Joint Entrance Examination (Main) 2018- With Rank असा ऑप्शन सीबीएसईने दिला आहे. यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थाने आपला आसान क्रमांक आणि जन्म तारीख दाखल केल्यानंतर त्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

बारावीनंतर इंजिनिअरींगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांसाठी सीबीएसईकडून प्रत्येक वर्षी ज्वाइंट एंट्रेंस एग्जामिनेशन मेन अर्थात जेईई मेन (JEE Main) ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये लेखी तसेच ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते. यावर्षी गेल्या ८ एप्रिला यामधील लेखी तर १५ व १६ एप्रिलला ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी संपूर्ण देशातून जवळपास १४ लाख विद्यार्थांनी ही परीक्षा दिली होती.
@@AUTHORINFO_V1@@