दुचाकीच्या डिक्कीतून चोरी करणारे दोन जण जेरबंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |
 
 
जळगाव :
दुचाकीच्या डिक्कीतून चोरी करणारे दोन जण स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात सागर पार्कजवळ हेमांगी सुरेश डहाळे यांच्या दुचाकी (क्र. एमएच १९ एव्ही ७६८२) चे डिक्कीतून ९ रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने एटीएम कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल व रोख रक्कम लांबविली होती. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
 
 
दुचाकीच्या डिक्कीतून होणार्‍या चोर्‍यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, उपपोलीस अधीक्षक सचिन सांगळे यांनी पोलीस निरीक्षक सुनिल कुर्‍हाडे यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने त्यांनी पो.हे.कॉं. विजय पाटील, अनिल इंगळे, शशिकांत पाटील, संतोष मायकल, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, सुरज पाटील, गफुरखॉ तडवी यांना अशा चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शहरातील विविध भागात रवाना केले होते. कुर्‍हाडे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन तांबापुरा भागातील काही तरुण सागरपार्क, काव्यरत्नावली चौक, स्वातंत्र्य चौक, बहिणाबाई उद्यान याठिकाणी पार्कींगच्या ठिकाणी लावलेल्या गाड्यांच्या डिक्या उघडून त्यातील वस्तू चोरुन नेत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर याठिकाणी पथकातील कर्मचारी तैनात केले होते. रोशनखान हसनखान (२०, रा. तांबापुरा, पंचशिल नगर, जळगाव) आणि रहीमखान रशीदखान (१९, शहा अवलिया मशीदजवळ तांबापुरा) हे संशयितरित्या आढळून आल्यावर त्यांना ताब्यात घेतले होते.
 
 
दोघा चोरट्यांनी हेमांगी डहाळे यांच्या दुचाकीमधून चोरी केली असल्याची कबुली दिली.त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.आरोपींना पुढीलकामी रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपास पो.ना.अनिल फेगडे करीत आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@