सांगवी येथे भरधाव गाडी थेट हॉटेलच्या आत, १ मृत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |

 
 
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिचंचवड येथील सांगवी या भागात एक भरधाव फॉर्च्युनर गाडी धडक देत थेट हॉटेलच्या आत जावून घुसली. या अपघातात एक व्यक्ती ठार झाला असून इतर ३ जखमी झाले आहेत. आज दुपारी १ वाजेच्या सुमाऱ्यास ही घटना घडली. तसेच या अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.

 
 
 
सचिन जाधव (वय - ४०, नवी सांगवी) असे या फॉर्च्युनर चालकाचे नाव असून (एमएच -१२ केजे ०३३३) या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात ओमप्रकाश अंबादास पंदीलवार (वय - ६० , सांगवी हॉटेल चालक) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसवराज तळपदे (वय -५० , नवी सांगवी), सुवर्णा ओमप्रकाश पंदीलवार (वय - ५० नवी सांगवी), अनंत पंदीलवार (वय - १० वर्षे) हे जखमी झाले आहेत.
भरधाव फॉर्च्युनर अचानक धडक देत अनंत हॉटेलमध्ये घुसली. या अपघातीमधील जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
@@AUTHORINFO_V1@@