रोटरी वेस्टने स्थापनादिनी केली बालिकेची शस्त्रक्रिया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रंगला सोहळा, ६६० रुग्णांची तपासणी

 
जळगाव :
रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट या क्लबने स्थापना दिनी तरसोद येथील वर्षा धनसिंग भील या बालिकेची मोफत शस्त्रक्रिया केली. क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने सायंकाळी आयोजित सोहळ्यात सर्व माजी अध्यक्षांचा गौरव करण्यात आला.
रोटरी वेस्टने तरसोद येथे नुकतेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. त्या शिबिरात तरसोद, भादली, मन्यारखेडा व परिसरातील ६६० रुग्णांची मोफत तपासणी करुन मार्गदर्शन करण्यात आले. त्यातील गंभीर व ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांची रोटरी वेस्टच्या सदस्यांच्या आर्थिक सहकार्य आणि गोदावरी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या मदतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
 
 
रोटरी वेस्टच्या स्थापना दिनी ७ वर्षीय वर्षा भिल या बालिकेची अध्यक्ष ऍड.सुरज जहांगीर, मानद सचिव कृष्णकुमार वाणी, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ. आनंद दशपूत्रे व दत्तक गाव समिती प्रमुख गणेश झंवर यांच्या पुढाकाराने गोदावरी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे रोटरी वेस्टचे सदस्य डॉ. मिलिंद जोशी यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. क्लबचा स्थापना दिन व रौप्य महोत्सवी वर्ष अशा सेवाभावी पद्धतीने साजरा केल्याबद्दल डॉ. उल्हास पाटील यांनी रोटरी वेस्टचे अभिनंदन केले.
 
 
सांस्कृतिक सोहळ्यात रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष डॉ.अरुण बगडिया, सुनील सोनाळकर, रमण जाजू, संदीप काबरा, गनी मेमन, अरुण नंदर्षी, नितीन रेदासनी, डॉ. राजेश पाटील, अनिल कांकरिया, सुनील अग्रवाल यांचा अध्यक्ष ऍड. सुरज जहांगीर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. माजी अध्यक्ष अनिल बोरोले, विनोद बियाणी, किरण राणे, अनंत भोळे, योगेश भोळे यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. याप्रसंगी रमण जाजू, संदीप काबरा, नितीन रेदासनी, गनी मेमन यांनी मनोगत व्यक्त केले.
 
 
खेळांसह नृत्याचा आनंद...
रोटरी वेस्टच्या सर्व सदस्यांना रोटरीची चतुःसुत्री असलेले स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. रोटरी वेस्ट परिवारातील सदस्यांसाठी विविध खेळ व नृत्याचे आयोजन केले होते. यशस्वीतेसाठी रोटरी वेस्टचे सुनील सुखवाणी, समकीत मुथा, स्मिता मुथा, निखिल बियाणी, योगेश राका, विवेक काबरा, मनोज आडवाणी आदींनी परिश्रम घेतले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@