ट्रम्प यांना मिळू शकतो नोबेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |



सिओल : उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये चर्चा घडवून आणल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी ठरू शकतात, असे वक्तव्य द.कोरियाचे राष्ट्रपती मून जइ इन यांनी केले आहे.

तब्बल ७० वर्षांहून अधिक काळ वेगवेगळे असलेले आणि ६५ वर्षांपासून एकमेकांविरोधात लढत असलेल्या उत्तर आणि दक्षिण कोरियाला ट्रम्प याने एकत्र आणले असून त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु झाली आहे, असे मून यांनी म्हटले आहे. तसेच या चर्चेचे फलित म्हणून गेल्या अनेक वर्षांच्या कोरियन युद्धाची समाप्ती झाली आहे. ट्रम्प यांनी या चर्चेसाठी सातत्याने प्रयत्न केले, तसेच यामुळे कोरियन द्वीपकल्पामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, ऐवढीच त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांसाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या दोन वर्षांच्या काळामध्ये उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होती. आपल्या आक्रमक आणि फटकळ स्वभावासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ट्रम्प यांनी अनेक वेळा उत्तर कोरियाला पूर्णतः नष्ट करण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली होती. परंतु गेल्या चारच महिन्यामध्ये हे सर्वच चित्र पालटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@