नमो संघाचे ३ दिवसीय महाआरोग्य शिबीर यशस्वी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |

५ हजार ७७५ आबालवृद्धांनी घेतला लाभ

 
 
जळगाव :
भारतीय नरेंद्र मोदी संघ जळगावतर्फे २७ ते २९ या कालावधीत बिग बाजारजवळ खान्देश सेंट्रल मॉल येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचा रविवारी, २९ रोजी दुपारी समारोप झाला. लग्नसराई आणि कमालीचे तापमान आणि असह्य उकाडा असूनही या अडीच दिवसात विविध प्रकारच्या ५ हजार ७७५ रुग्णांनी लाभ घेतला. यामुळे भारतीय नमो संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
 
 
शिबिराला अनेकांचे योगदान
शिबिरासाठी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन आणि खान्देश सेंट्रल मॉलचे सर्वेसर्वा, माजी महापौर रमेश जैन, जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे तसेच जी.एम.फाउंडेशन, भाजपशी संलग्न केमिस्ट महासंघ, काही नामांकित हॉस्पिटल्स यांचे विशेष सहकार्य लाभले.
 
 
पदाधिकार्‍यांचे परिश्रम
भारतीय नमो संघाचे राष्ट्रीय महामंत्री, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, गोभक्त नरेश खंडेलवाल, युवा प्रदेशाध्यक्ष अनिल पगारिया, डॉ.सुरेशसिंग सूर्यवंशी, केमिस्ट महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निशिकांत मंडोरा, नमो संघाचे महानगर अध्यक्ष पंकज जैन, उपाध्यक्ष सुनील श्रीश्रीमाळ आणि सचिव प्रवीण कुलकर्णी, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा, कवयित्री डॉ. प्रियंका सोनी, दिनेश बोरा, अजय जोशी, गणेश पाटील सचिन बाविस्कर, वैशाली पाटील, मनिषा जोशी, सरोज पाठक, भारती पाटील, जिनल जैन, पंकज शर्मा, गणेश पाटील, सचिन जांगडा, विकी आणि हार्दिक पिपरीया यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम महाशिबीर यशस्वी केले.
 
मंदाताई खडसे यांचे अनोखे सहकार्य
थंड पाण्याचा टँकर, रुग्ण अन् आप्त खूष, असह्य तापमान आणि उकाडा तसेच नेमके लग्नसराईचे दिवस आणि थंड पाण्याच्या जारची टंचाई लक्षात घेऊन आयोजकांच्या विनंतीवरुन जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांनी तिन्ही दिवस शेकडो रुग्ण व आणि त्यांच्या परिवारासाठी थंड पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले होते. जळगावातील हा अभूतपूर्व अन् अनोखा प्रयोग ठरल्याचे अनेकांनी सांगितले.
महाशिबिरातील ठळक वैशिष्ट्ये
शिबिरात सर्वच प्रकारच्या अवयवांशी संबंधित आजार, विकारांशी संबंधित आबालवृद्ध रुग्णांची तपासणी झाली. उन्हाची तमा न बाळगता दूरवरुन आलेल्या गरजू रुग्णांनी लाभ घेतला.
 
विशेष म्हणजे काही रुग्णांजवळ नोंदणी शुल्काची नाममात्र रक्कमही नव्हती. ती कार्यकर्त्यानी देत सहवेदना, माणुसकीचे हृदयस्पर्शी प्रत्यंतर आणून दिले. त्यांपैकी ७ जणांवर हृदयशस्त्रक्रिया, सुमारे ७५ जणांवर अँजिओप्लास्टी, १८५ नेत्ररुग्णांवर, ९ महिला रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहे. कानाच्या तक्रारी असलेल्यांपैकी १२ जणांच्या कानाच्या शस्त्रक्रिया केल्या जातील.
खान्देश सेंट्रल मॉलच्या दक्षिण भागातील विस्तीर्ण भूखंडावर भव्य मंडप आणि त्यात विविध रुग्ण तपासणीसाठीचे १२ स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले होते. शिबिरासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांचे खूप सहकार्य लाभले. इंडो अमेरिकन हॉस्पिटल, तसेच गणपती हॉस्पिटलमधील अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स व प्रशासन तसेच जी.एम.फाउंडेशन, भाजपशी संलग्न केमिस्ट महासंघ यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ.सुरेशसिंह सूर्यवंशी यांच्यासह अनेक नामांकित, तज्ज्ञ डॉक्टर्स सहकार्य करण्यासाठी शिबीर स्थळी वेळोवेळी उपस्थित असत.
@@AUTHORINFO_V1@@