कवींद्र गुप्ता जम्मू-काश्मीरचे नवे उपमुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील मंत्रिमंडळात आज फेरबदल करण्यात आले. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या अध्यक्षतेखाली हे फेरबदल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्री पदावर आज कवींद्र गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हा शपथविधी सोहळा कन्वेन्शन सेंटरमध्ये आज पार पडला. 
 
 
 
 
आज एकूण आठ मंत्र्यांना एन.एन. व्होरा यांनी गोपनीयतेची शपथ दिली. यात सहा मंत्री भारतीय जनता पक्षाचे असून दोन मंत्री पीडीपीचे आहेत. सगळ्यात आधी जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ कवींद्र गुप्ता यांना देण्यात आली. भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र कुमार मनियाल, सतपाल शर्मा, सुनील कुमार शर्मा, राजीव जसरोटीया आणि शक्ती राज परिहार यांनी मंत्र्यांच्या रुपात शपथ घेतली. 
 
 
 
 
तर पीडीपीकडून मोहम्मद खलील आणि मोहम्मद अश्रफ मीर यांनी शपथ घेतली. जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळात हा मोठा फेरबदल मानला जात आहे. आज मेहबूबा मुफ्ती यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. 
 
@@AUTHORINFO_V1@@