कंडारी ग्रामस्थांचे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |

पाणीप्रश्‍नी उपविभागीय अधिकार्‍यांना ग्रामस्थांचा इशारा

भुसावळ, २९ एप्रिल :
तालुक्यातील कंडारी गावात नेहमीच पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. त्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजना राबविण्यात यावी. वॉर्ड क्र.५ साठी दीपनगर केंद्राकडून पाणी पुरवठा करण्यात यावा. वार्ड क्र.२ व ३ मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. जिल्हा टंचाई निवारण कार्यकमांतर्गत मिळालेले वीज पंप, व्हाल बसविण्यात यावे. गावठाण व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी कंडारी ग्रामस्थ महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषणास बसणार आहेत. ग्रामस्थांतर्फे उपविभागीय अधिकार्‍यांना या इशार्‍याचे निवेदन देण्यात आले आहे.
 
 
२००८-०९ पासून कंडारी ग्रामपंचायत नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा करीत असून त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनुसार सर्व बाबींची पूर्तता करुन सुध्दा नवीन पाणीपुरवठा योजनेची मंजुरी मिळत नाही. या उलट तालुक्यातील इतर गावांनी प्रस्ताव सादर करताच त्यांना मंजुरी मिळून कामांना सुरवात झाली. परंतु नवीन योजनेचा प्रस्ताव गेल्या १० वर्षापासून प्राधिकरणकडे धूळखात पडून आहे. तसेच वार्ड क्र.५ साठी सुध्दा २०१३ पासून दीपनगर केंद्राकडे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रा.पं., तालुका, जिल्हा प्रशासनाकडून मागणी केली जात आहे.
 
 
तसेच उर्जामंत्री ना.चंद्रशेखर बानवकुळे यांनी भुसावळ, रावेर तालुक्यातील ९ गावांची पा.पु. योजना महानिर्मितीच्या माध्यमातून राबविण्याची घोषणा केली तरी देखील दीपनगर प्रशासन ‘ढिम्म’ आहे. ग्रा.पं.ने १९६० मध्ये विहिर खोदून पाणीपुरवठा केला होता. त्याच विहिरीतून आजही वार्ड क्र.२ व ३ ला पाणी पुरविले जाते विहिर आटल्यामुळे दोन्ही वार्डांना ते पुरत नाही.
 
 
निवेदनावर यशवंत चौधरी, सदस्य सुर्यभान पाटील, माधुरी पाटील, सविता मोरे, चंदन चौधरी, भूषण पाटील, शांताराम चौधरी, गोपाळ जेठवे, सरजू तायडे, प्रमोद कोळी, रमेश मोरे, नितीन मोरे, रविंद्र जेठवे, संदीप चौधरी यांच्या सह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@