तेजीच्या बैलांची शेअर बाजारावर पकड, निफ्टी जाणार १० हजार ८०० बिंदूंवर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |

निफ्टीच्या दैनंदिन चार्टवर बुलिश कॅण्डल
निफ्टीला १० हजार ५८० ते १० हजार ५५० बिंदूंवर आधार

 
 
निफ्टी डिसेंबर २०१७ पासून सर्वात खाली
साखरेपेक्षा गुळाचे भाव जास्त
सध्यातरी तेजीच्या बैलांची मजबूत पकड शेअर बाजारावर बसली असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० हजार ८०० बिंदूंवर जाण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. हा निर्देशांक सध्या सकारात्मक हालचालींमध्ये असून जोपर्यंत तो १० हजार ४८० ते १० हजार ५०० बिंदूंची पातळी तोडत नाही तोपर्यंत तरी बाजारात तेजी कायम राहणार आहे. निफ्टीने शुक्रवारी १० हजार ७०० बिंदूंची मानसशास्त्रीय पातळी (सायकॉलॉजिकल लेव्हल) ही ओलांडली होती.
 
निफ्टीने १० हजार ५०० बिंदूंपासून १० हजार ६३८ बिंदूंच्या मर्यादेत राहत शुक्रवारी १० हजार ७१९ बिंदूंना स्पर्शही केला होता. दिवसअखेरीस तो१० हजार ६९२ बिंदूंवर बंद झाला होता. त्याने दैनंदिन चार्टवर बुलिश कॅण्डल (तेजोबत्ती!) तयार केली असून तो आणखी वरची पातळी गाठण्याच्या तयारीत आलेला आहे.
 
 
याआधी निफ्टीने अर्थसंकल्पाच्या काळात गाठ लेल्या ११ हजार १७१ बिंदूंच्या पातळीवरुन खाली येत ९९५१ बिंदूंची नीचांकी पातळी गाठली होती. तेथून क्रमश: झेप घेत तो १० हजार ७०० बिंदूंची पातळी वर जाऊन पोहोचला आहे. आता तो जर १० हजार ६३८ बिंदूंच्या वर काही दिवसांपर्यंत राहिला तर तो १० हजार ८०० बिंदूंपर्यंत जाऊ शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याला आता १० हजार ५८० ते १० हजार ५५० बिंदूंवर आधार (सपोर्ट) आहे. अशा रीतिने निफ्टीचे आधार बिंदूंही दिवसेंदिवस वरच्या पातळीवर हलत (शिफ्ट होत) असून बाजाराचा पायाही उंचावू लागलेला आहे. याचाच अर्थ असा की बाजार आता तेजीच्या बैलांच्या पकडीत आलेला आहे. बाजारातील अस्थिरता गेल्या महिन्यापासून तरी संपुष्टात आली असून तो एकच एक म्हणजे तेजीच्या दिशेने वाटचाल करु लागलेला आहे. तसेच डिसेंबर २०१७ पासून त्याने गेल्या चार महिन्यातील सर्वात खालची पातळी गाठली आहे.
 
 
ऑप्शन्सच्या आघाडीवर पाहिले तर १० हजार ५०० बिंदूंच्या पातळीवर जास्तीत जास्त पुट खरेदी करण्यात आले असून त्याखालोखाल १० हजार ४०० बिंदूंचा पुट घेण्यात आलेला आहे. कॉलच्या बाबतीत १० हजार ९०० व १० हजार ११००० बिंदूंचा स्तर ट्रेडर्सच्या पसंतीस उरलेला आहे. यावरुन सर्वात जास्त हालचाल ही १० हजार ६०० ते १० हजार ८०० बिंदूंपर्यत होणार आहे.
 
 
मे महिन्याच्या सेरीजला ३५ दिवसांचा दीर्घ काळ मिळालेला असून व्यवहारांची संख्याही २४ राहणार आहे. आगामी कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर बाजारातील अस्थिरता संपणे हे शुभ चिन्ह म्हटले पाहिजे.
बँक निफ्टीच्या बाबतीतही दैनंदिन चार्टवर बुलिश बेल्ट होल्ड कॅण्डल तयार झालेली आहे. याचाच अर्थ तेजीचे बैल त्याला वरच्या पातळीवर घेऊन जाणार आहेत! त्याने २५ हजार २५० बिंदूंचा प्रतिकार मोडून काढलेला असून २५ हजार ३०० बिंदूंच्याही वरची पातळी गाठली आहे. तो आता २५ हजार ७०० बिंदूंच्या पातळीवर झेप घेण्यास सज्ज झालेला आहे. खालच्या बाजूला त्याला २५ हजार २५० ते २५ हजार १०० बिंदूंवर आधार मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक शेअर्सच्या बाबतीत पाहिले तर आशियन पेंट्स, बजाज ऑटो, अमारा राज बॅटरीज, पीईएल, ब्रिटानिया, डाबर, एसआरएफ, मॅक्डोवेल, युनायटेड ब्रुअरीज लि., सन फार्मा, ग्रॅन्युल्स, टाटा मोटर्स आणि काही निवडक सार्वजनिक क्षेत्रातील बँका चांगल्या असल्याचे तज्ञांचे मत आहे.
विक्रमी उत्पादनामुळे साखरेच्या किंमती मोठ्या प्रमाणावर खाली आलेल्या असतांना गुळाचे भाव मात्र वाढत आहेत. मुंबई व दिल्लीत सध्या साखर २८०० रुपये प्रति क्विंटलच्याही खाली गेली आहे. तर गूळ २८०० ते ३००० रु. प्रति क्विंटल भावाने विकला जात आहे. म्हणजेच ऊस उत्पादकांच्या दृष्टिने साखरेपेक्षा गूळच अधिक गोड झालेला आहे! त्यामुळे साखरेवर सेस लावण्याबरोबरच इथॅनॉलचा वापरही वाढविण्यावर विचार सरकार करीत आहे.
 
 
काम करण्याच्या दृष्टिने कर्मचार्‍यांची सर्वात आवडती कंपनी सध्या मायक्रोसॉफ्ट ही बनलेली आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर ऍमेझॉन इंडिया असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. तर देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) ही कर्मचार्‍यांच्या पसंतीस उतरलेली आहे.
 
विजय माल्या प्रत्यार्पण प्रकरणी भारताला मोठे यश
देशभरातील बँकांची हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेला किंगफिशर एअरलाईन्सचा सर्वेसर्वा विजय माल्या याच्या प्रत्यार्पणाच्या बाबतीत भारताला मोठे यश मिळाले आहे. लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयात भारतातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे स्वीकारण्यात आले आहेत. त्यामुळे भारताची बाजू मजबूत होऊ लागलेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सरकार माल्याला देशात परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. न्यायालयाने या प्रकरणी येत्या ११ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत माल्याचा जामिन कायम राहणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@