जम्मू-काश्मीरच्या राजकारणात आज मेहबूबा मुफ्ती करणार मोठा फेरबदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजकारणात आज मोठा फेरबदल करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळात आज मोठा फेरबदल करणार आहेत. या मंत्रिमंडळाच्या बदलात जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्री पदावर आता कवींद्र गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
 
 
त्यामुळे आज नवीन नियुक्त केलेले मंत्री दुपारी १२ वाजता आपआपल्या पदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल एन.एन. व्होरा मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. हा शपथविधी सोहळा राजभवन ऐवजी कन्वेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. मंत्रिमंडळातील सगळ्या नवीन सदस्यांची यादी अजून जाहीर केली नसल्याने शपथविधी सोहळ्यात कोणत्या सदस्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे हे कळणार आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@