एम्सकडून लालू समर्थकांविरोधात पोलिसाकडे तक्रार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |



नवी दिल्ली : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना एम्सकडून डिस्चार्ज दिला जाऊ नये, म्हणून लालू समर्थकांकडून एम्समध्ये घालण्यात घालण्यात आलेल्या गदारोळाविरोधात एम्स प्रशासनाने पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. एम्सचे उप सुरक्षा अधिकारी दीपक कुमार यांनी याविषयी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून रुग्णालयात तोडफोड केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

कुमार यांनी लेखी स्वरुपात ही तक्रार केली असून यामध्ये लालू प्रसाद यांना रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्याबद्दल या समर्थकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रुग्णालयाच्या निर्णयाविरोधात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ८-१० अज्ञात लोक रुग्णालयामध्ये दाखल झाले. त्यांनी लालू यांना एम्समधून डिस्चार्ज देऊ नये, म्हणून घोषणाबाजी केली. तसेच रुग्णालयाचा काचा फोडल्या, अशी तक्रार कुमार यांनी केली. तसेच या आरोपींवर लवकरात लवकर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


एम्सचे पोलिसांना पत्र :



लालू यांना किडनी, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या अनेक आजारांनी गेल्या काही दिवसांपासून ग्रासल्याचे बोलले जात होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लालू यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर काल एम्स रुग्णालयाने लालू यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्याविषयी घोषणा केली. यावर लालूंनी आपली प्रकृती अजून स्थिर नसल्याचे म्हणत, आपल्याला आता लगेच डिस्चार्ज देऊ नये, अशी विनंती रूग्णालया केली होती. तसेच आपले काही बरेवाईट झाल्यास त्याला एम्स जबाबदार असेल अशी धमकी देखील दिली होती.
@@AUTHORINFO_V1@@