वेल्हाळे तलावातील ३ टन मासे मृत्यूमुखी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |

दीपनगर वीज केंद्रातील राखेमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा आरोप

 
 
भुसावळ :
वेल्हाळे येथील ऐतिहासिक तलावात होणारे मत्स्यपालन गेल्या चार ते पाच वर्षांपासून धोक्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून वेल्हाळे ऍश पॉडमधील राखेचे विल्हाळे तलावात उत्सर्जन होत असल्याने तब्बल तीन टन मासे चार दिवसांत मृत झाल्याचा आरोप वेल्हाळेतील मच्छीमार सोसायटीने केला आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंंबित तब्बल ९० कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
 
 
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात निर्मितीनंतर टाकाऊ राख वेल्हाळे येथील ऍशपॉडमध्ये सोडली जाते. मात्र वारंवार ऍशपॉडमधून राखेचे उत्सर्जन होत असल्याने राखेतील प्रदूषणकारी घटक पाण्यात मिसळले जात आहेत. या प्रदूषणकारी घटकांमुळे गेल्या चार दिवसांपासून तलावातील मासे मृत्यूमुखी पडल्याची बाब समोर आली आहे. दीपनगर औष्णिक केंद्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे लाखोंचे नुकसान झाल्याचा आरोप मच्छीमार सोसायटीचे संदेश पाटील यांनी केला आहे.
पुन्हा वाढ होण्याची भीती दरम्यान गेल्या चार दिवसांत वेल्हाळे तलावातील तब्बल तीन टन मासे मृत झाले आहेत. राखेच्या उत्सर्जनामुळे यात पुन्हा वाढ होण्याची भीती आहे.
मच्छीमार उपासमारीच्या मार्गावर
वेल्हाळे ऍश पॉडमधून थेट तलावात राखेचे लोट येत आहेत. या राखेत प्रदूषणकारी घटक व रसायने असल्याने मासे हकनाक मृत होत आणि मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दीपनगर केंद्राकडून भरपाई मिळावी, अशी मागणी मच्छीमार संदेश पाटील यांनी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@