रामेश्वरलाल काबरा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |



 

नवी दिल्ली : रामरत्नासमूहाचे अध्यक्ष रामेश्वरालाल काबरा यांना राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच पद्मश्रीपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काबरा यांचा जन्म१४ ऑक्टोबर १९३३ रोजी बंगालमधील शेरपूर येथे झाला. १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीनंतर ते नेपाळमधील विराटनगर येथे स्थायिक झाले. १९६६ मध्ये मुंबईत येऊन त्यांनी ट्रेडिंगचा व्यवसाय सुरु करुन निर्यात आणि इंडस्ट्रीजच्या दिशेने अग्रेसर होत वाइंडिंग वायर्स, केबल्स, ऑटोमेटेड कार पार्किंग, कॉपर आणि इलेक्ट्रिकल्स उत्पादनांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. आज त्यांनी या व्यवसायांमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्वाबद्दल भारत सरकारने त्यांना यंदा पद्मश्री’ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवले आहे.

 
उद्योग क्षेत्रातील कारकीर्दीव्यतिरिक्त सामाजिक कार्याच्या आणि राष्ट्रनिर्माणाच्या क्षेत्रातही ते वयाच्या बाविसाव्या वर्षीपासून सक्रिय आहेत. माहेश्वरी प्रगती मंडळ, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, केशवसृष्टी, रामरत्ना विद्यामंदिर, रामरत्ना इंटरनॅशनल डे स्कुल इत्यादी संस्थांसह वनवासी आणि दुर्गम भागातील समाज बंधुंच्या उत्थानासाठी सन १९९६ पासून वनबंधू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि २००३ पासून वनबंधू परिषदेचे अध्यक्ष आणि संरक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. एकल अभियानाच्या माध्यमातून ६५ हजार पेक्षा जास्त गावांमध्ये त्यांचे सेवाकार्य सुरू आहे. अभियान पंचमुखी योजनेच्या माध्यमातून अनेक दुर्गम भागात शिक्षण, आरोग्य, संस्कार, स्वावलंबन आणि स्वाभिमान जागरणाचे त्यांचे कार्य सुरू आहे. एकल अभियान ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे.
 
 

आज वयाच्या ८४ व्या वर्षीही वनवासी समाजाच्या विकासासाठी महिन्यातील १५ दिवस ते दुर्गमभागातील वनवासी क्षेत्रात प्रवास करत असतात. पद्मश्रीपुरस्काराने त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@