आरक्षणासंबंधी जाणूनबुजून अफवा पसरवल्या जात आहेत : राजनाथसिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |




नवी दिल्ली :
'केंद्र सरकार हे देशातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून त्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलली जात आहेत. परंतु आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून काही जणांकडून आरक्षणासंबंधी जाणूनबुजून अफवा पसरवल्या जात आहेत' असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले. दलित संघटनांकडून काल पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' आंदोलनच्या पार्श्वभूमीवर आज ते लोकसभेत बोलत होते.

'सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल केल्यानंतर अवघ्या सहा दिवसांच्या आत केंद्र सरकारने यावर पुनर्विचार दाखल करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. परंतु दलित समाजासमोर वारंवार चुकीचे दृश्य उभे करून त्यांना आंदोलन करण्यास भाग पडले जात आहे.' असे सिंह यांनी म्हटले.

तसेच सरकार दलित विरोधी असल्याचे देखील चित्र रंगवले जात आहे. परंतु सरकारने सातत्याने दलितांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतले आहेत, असे ते म्हणाले. सरकारने २०१५ मध्ये लोकसभेत अनेक प्रस्ताव पारित करून घेतले असून अॅट्रॉसिटीतील गुन्हांचा लवकर शोध व्हावा, म्हणून नवी व्यवस्था याद्वारे निर्माण केली आहे. पीडितांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीमध्ये वाढ केली आहे. तसेच गुन्हांचा शोध घेण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश नव्या कायदांमध्ये लागू केले आहेत. त्यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीवर संशय घेणे चुकीचे असून नागरिकांनी सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा' असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
@@AUTHORINFO_V1@@