भिवंडीमध्ये पुन्हा एकदा 'अग्नीतांडव'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |

दोन दिवसात आगीच्या दोन घटना

गोदामांसह एका बँक शाखेला आग



भिवंडी : गेल्या सहा महिन्यांपासून भिवंडीमध्ये सातत्याने सुरु असलेली आगींची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. गेल्या महिन्यात दोन ठिकाणी आग भडकल्यानंतर या महिन्याच्या या पहिल्या आठवड्यात भिवंडीत पुन्हा एका आग लागण्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे काल आणि आज या दोन दिवसांमध्ये भिवंडीत दोन वेगवेळ्या ठिकाणी आग लागली असून यामध्ये काही गोदाम आणि एक बँक शाखा जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही ठिकाणांची आग विझवली आहे. परंतु याठिकाणातील सर्वच वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

भिवंडीमधील नारपोली येथे असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेला आज पहाटे अचानकपणे आग लागली. आग हळूहळू संपूर्ण शाखेमध्ये पसरल्यानंतर आग शाखेबाहेर येऊ लागली. यानंतर पहाटे घराबाहेर पडलेल्या काही नागरिकांनी ही आग पहिली आणि अग्निशमन दलाला तातडीने पाचारण केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गड्याने तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्ने सुरु केले. दरम्यान आगीचे नेमके कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही. परंतु यामध्ये बँकेची अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून नष्ट झाल्याचे बोलले जात आहे.

याच बरोबर काळ दिवसभरात भिवंडीमध्ये दोन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. यातील पहिली घटना ही काल पहाटे घडली होती. भिवंडीमधील गुंदावली या गावात असलेल्या काही गोदामांना काल पहाटे अचानक आग लागली होती. यामध्ये तब्बल ६ गोदामे जळून खाक झाली होती. तसेच दुपारी भिवंडीतीलच पूर्णा या गावात असलेल्या एक गोदामाला आग लागली होती. परंतु यामध्ये कसल्याही प्रकारची मोठी हानी झाली नव्हती.
@@AUTHORINFO_V1@@