पत्रकारांसाठी लागू केलेले नवे नियम मागे घेण्याचे पंतप्रधानांचे निर्देश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |

खोटी बातमी दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द करण्यासंबंधी होता निर्णय


 
 
 
नवी दिल्ली : प्रसार माध्यमांमध्ये वाढत निघालेले फेक न्युजचे (खोट्या बातमी) प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने  लागू केलेले नियम मागे घेण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. खोट्या बातम्यांच्या समस्येविषयी 'प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया'शी (पीसीआय) चर्चा करून यावर मार्ग काढावा असे देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
 
दरम्यान आज सकाळीच केंद्र सरकारने खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांसाठी काही नवे नियम लागू केले होते.  ज्यामध्ये खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांची मान्यता रद्द करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते.  प्रसार माध्यमांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही नवे बद्दल करून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार मुद्रित माध्यमांमध्ये (प्रिंट मिडिया) एखादी खोटी बातमी छापल्यास त्याची तक्रार 'प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया' (पीसीआय)कडे तसेच इलेक्ट्रोनिक मध्यमांमध्ये खोटी बातमी दिल्यास त्याची तक्रार न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडे (एनबीए) करता येणार होती. यानंतर यासंबंधी लेखी तक्रार जमा करून येत्या १५ दिवसांमध्ये यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे या अद्यादेशात सांगण्यात आले  होते.
 
 
तसेच तक्रारदारांच्या आरोपामध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित पत्रकारावर नव्या नियमानुसार थेट कारवाई करण्यात येणार होती. यामध्ये पहिल्यांदा खोटी बातमी दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा अशा प्रकारची चूक केल्यास वर्षभरासाठी आणि त्यानंतर अशी चूक केल्यास कायमस्वरुपी त्याची मान्यता रद्द करण्याचे निर्देश केंद्र सरकारने जारी केले होते. परंतु यानंतर सोशल मिडीयावर 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'च्या नावाखाली अनेक पत्रकारांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली होती.  


 
 
 


सरकारने तयार केलेला अध्यादेश :
 

 
 
@@AUTHORINFO_V1@@