युथ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत नाशिकच्या साक्षीचा सुवर्ण पंच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : नाशिकचे प्रथम महापौर शांताराम बापू वावरे व माजी आमदार निवृत्ती भिकाजी गायधनी यांची नात अकोला क्रीडा प्रबोधनीची साक्षी उमेश गायधनी या मुष्टीयोद्धापटूने दमदार प्रदर्शन करत युथ राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.
 
हरियाणातील रोहतक येथे २४ ते ३० मार्च या कालावधीत युथ राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेत साक्षीने ८१ किलो वजनी गटात दमदार कामगिरी बजावली आहे. या विजयासोबतच साक्षीने निवड युथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धापूर्व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरामध्ये आपली जागा पक्की केली आहे. साक्षीने याच वर्षी कजाकिस्तान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आणि अकोल्यात पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. राज्य क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात साक्षीने प्रशिक्षण घेतले आहे.
 
महाराष्ट्र संघासोबत राकेश यादव, श्रीकृष्ण आजगावकर, मिलिंद पवार, शिल्पा गायधनी आदी खेळाडू गेले होते. साक्षीच्या या यशाचे क्रीडा विभागाचे सहसंचालक नरेंद्र गोयल, उपसंचालक आनंद व्यंकटेश्वर, सुधीर मोरे, अमरावती विभागाचे उपसंचालक प्रतिभा देशमुख, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष जय कोहली, सचिव भारतकुमार, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा क्रीडाधिकारी गणेश कुलकर्णी, श्याम देशपांडे बॉक्सिंग असोसिएशनचे विजय शर्मा यांनी कौतुक केले. युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र संघातर्फे साक्षी गायधनीने उत्कृष्ट प्रदर्शन करत देशात महाराष्ट्राचे विशेषतः अकोल्याचे नाव प्रसिद्ध केले. आगामी काळात बँकॉक (थायलंड) येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी साक्षीची निवड झाली आहे. या स्पर्धेतही साक्षी उत्कृष्ट प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा आहे.
 
युथ एशियन चॅम्पियनशिपसाठी निवड
 
या दमदार विजयासोबतच साक्षी गायधनीची निवड बँकॉक (थायलंड) येथे सुरू होणार्‍या युथ एशियन चॅम्पियनशिपसाठी झाली आहे. ही स्पर्धा १९ ते २८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेतूनही तिच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
सतीशचंद्र भट्ट, राज्य प्रशिक्षक क्रीडा प्रबोधिनी अकोला
 
@@AUTHORINFO_V1@@