कोरपनानंतर गोंडपिपरी, राजूरा, जिवती येथे बोगस बिटी बियाण्यांबाबत पोलीसांचे लक्ष केंद्रीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
ग्रामसेवक, पोलीस पाटील सर्वांकडून मागणार अहवाल
 
 
चंद्रपूर : खोटया आमिषाला बळी पडून शेतक-यांना फसवणा-या बियाने कंपन्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलणे सुरु केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत बोगस बिटी बियाणे विक्री करणा-या, साठवणाऱ्या आणि शेतात पेरणा-या सर्वांवरच कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून जिल्हयातील चार तालुक्यामध्ये विशेष लक्ष घालण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी संचिन कलंत्रे यांनी दिले आहे. 
 
शेतक-यांनी बोगस बिटी बियाण्यांचा वापर करुन शेती व जनतेचे आरोग्य धोक्यात आणू नये, बंदी घातलेले बियाणे वापरुन कायदयाचा भंग करु नये तसेच जमिनीची पत हे बियाणे पेरुन घालवू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. हसन्नाबादे यांनी केले आहे. या बैठकीमध्ये कृषी विभागाने गेल्या आठवडयाभरात सुरु केलेल्या धाड सत्राचा अहवाल देण्यात आला. या बैठकीला उपस्थित असणारे अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी कोरपना, गोंडपिपरी, राजूरा व जिवती यांच्यासह भद्रावती, वरोरा व चिमूर तालुक्यातील पोलीस यंत्रणेला याबाबत सूचना देण्यात आल्या असून अशा पध्दतीच्या बियाण्यांची गुप्तपणे खरेदी, विक्री होत असेल तर त्यावर यंत्रणेने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे सांगितले.
 
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.एस.किरवे, आत्माचे उपसंचालक आर.जे.मनोहरे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी मधुकर सोनटक्के आदींनी यावेळी जिल्हयातील बोगस बिटी बियाण्यांबाबतच्या सद्यास्थितीचा आढावा दिला. वेगवेगळया यंत्रणा याबाबतीत जागरुक असून तालुक्यातून अहवाल मागविला जात असल्याचे सांगितले. अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी या संदर्भात नागरिकामध्ये जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन केले असून विक्रेत्यांच्या आमिषाला बळी पडून शेतक-यांची फसवणूक होऊ नये यासाठी पोलीस व कृषी विभागाने संयुक्तरित्या धाडसत्र राबवावे, असे आवाहन केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@