’ग्राहक मंच’चे राष्ट्रीय अधिवेशन २१,२२ एप्रिल रोजी मुक्त विद्यापीठात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नाशिक : ’अखिल भारतीय ग्राहक मंच’ चे २१ आणि २२ एप्रिल असे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणार आहे. अधिवेशनात मंचचे देशाभरातील सर्वच राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्याचे उद्घाटन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत होणार आहे.
 
महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार सदस्य समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी बैठक झाली. त्यामध्ये समितीचे राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय झाला. या अधिवेशनासाठी केंद्रीय अन्न पुरवठामंत्री रामविलास पासवान, राज्याचे पुरवठामंत्री गिरीश बापट, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आदींना आमंत्रित करण्यात येणार आहे तर अधिवेशनात ग्राहकांना अन्नपुरवठा करणार्‍या वितरण पद्धतीतील दोष आणि त्यावरील उपायांवर चर्चा होईल.
 
तसेच राज्या-राज्यातील सदस्यांकडून मांडण्यात येणार्‍या अडचणींवर नेमकी काय उपाययोजना करता येईल याबाबत ऊहापोह होईल. ग्राहक सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख होण्यासाठी काय काय सुविधा करता येतील यावर अधिवेशनात विशेष लक्ष दिले केंद्रित केले जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी प्रा. दिलीप फडके, औरंगाबादचे प्रांत कार्यकारिणी समिती सदस्य ओमकार जोशी, रवींद्र इंगळीकर, जळगावचे विकास महाजन, राजेंद्र कोतले, सुभाष देशपांडे, श्रीकांत देशपांडे, प्रकाश सोनी, चंद्रशेखर वाड आदी उपस्थित होते.
 
आधारकार्ड रेशनकार्डसोबत जोडले नसलेल्या नागरिकांनाही स्वस्त धान्य द्यावे. या गरजू शिधापत्रिकाधारकांना केवळ आधार जोडणी झाली नाही म्हणून लाभापासून वंचित ठेवता कामा नये असा प्रमुख मुद्दा समितीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक न झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ग्राहक पंचायतीची स्थापना बिंदूमाधव जोशी यांनी केली. ते अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे संस्थापक होते. ग्राहक संरक्षण कायदा निर्मितीमध्ये यांचा महत्त्वाचा वाटा होता. बिंदूमाधव जोशी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३१ रोजी अनंत चतुर्दशीला झाला. त्यांचे वडील बटुकभैरव जोशी हे लो. टिळक यांचे अंगरक्षक होते. त्यांचा प्रभाव असल्यामुळे बिंदूमाधव जोशी यांनी तालमीत जाऊन बलोपासना केली होती. पुण्यातील स. प. महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी संपादन केली. १९५४ मध्ये दादरा-नगर हवेली येथील पोर्तुगीज राजवटीच्या विरोधात झालेल्या सशस्त्र उठावात त्यांनी भाग घेतला होता. पुढे ते मुक्तिसंग्राम लढ्यात सहभागी झाले होते. देशभरातील ग्राहकांना संघटित करण्याच्या उद्देशाने १९७४ मध्ये पाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ग्राहक पंचायतीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. सर्वसामान्य ग्राहकाला त्याचे हक्क मिळवून देणारी ही चळवळ देशभर फोफावली. जोशी यांच्या अथक प्रयत्नांमुळे १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला.
 
महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेवर असताना १९९५ मध्ये ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली होती. कॅबिनेट दर्जा असलेल्या या समितीचे अध्यक्षपद बिंदूमाधव जोशी यांनी भूषविले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@