पालिकेच्या सर्वसाधण सभेत तुफान हाणामारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |

तणावपूर्ण शांतता : पोलीसांच्या हस्तेक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला

नंदुरबार ३ एप्रिल :
नंदुरबार पालिकेच्या सर्वधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले, यामुळे मंगळवारी दुपारच्या सुमारास मोठा तणाव निर्माण झाला होता.
 
 
केवळ सभागृहातच नव्हे तर ही हाणामारी रस्त्यावर आल्याने, तलवारी निघाल्याने एकच धावपळ उडाली. दुकानदारांनी तत्काळ दुकाने बंद केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
 
 
यात एका जमावाने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयावर दगड व बाटल्यांचा मारा केला. हाणामारीत नगरसेविका संगिता सोनवणे यांचे पती जखमी झाले आहेत. दरम्यान, नंदुरबारचा मंगळवारी बाजार असल्याने बाहेर गाववरून आलेल्या अनेकांची दुकाने बंद असल्याने मोठी गैरसोय झाली.
 
 
विषयाच्या वाचनावरून वाद !
नंदुरबार नगरपालिकेच्या सभागृहात मंगळवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सत्ताधारी कॉंग्रेस नगरसेवकांसह भाजपचे विरोधी नगरसेवक देखील उपस्थित होते. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू होऊन विषयाचे वाचन करण्यात येत होते. यावेळी भाजपाचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी प्रत्येक विषयाचे वाचन करण्यात यावे, अशी मागणी केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये सभागृहात बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला की, सभागृहातच दोनही गटातील काही नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली.
 
 
अन् कर्मचार्‍यांमध्ये धावपळ
सभागृहात सुरू असलेली हाणामारी पाहून सभागृहाबाहेर उभे असलेल्या नगरसेविका संगिता सोनवणे यांचे पती थेट सभागृहात आले. हे पाहून कॉंग्रेसचे नगरसेवक भडकले. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान कॉंग्रेसचे नगरसेवक कुणाल वसावे आणि नगरसेविका संगिता सोनवणे यांच्या पतीमध्ये हाणामारी झाली. त्यात ते जखमी झाले. नगरसेवकांमध्ये सुरू असलेला हा दांगडो पाहून इतर नगरसेवक व पालिकेतील कर्मचार्‍यांची धावपळ झाली. जो-तो आपला जीव मुठीत घेऊन सभागृहाबाहेर पडण्याचा प्रयत्न करती होता. हे दृष्य पाहून मुख्याधिकार्‍यांनाही घाम फुटला आणि त्यांनीही तेथून काढता पाय घेतला.
@@AUTHORINFO_V1@@