घानातील शिष्टमंडळाची ‘निमा’ला भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : आफ्रिकेतील घाना या देशाचे औद्योगिक क्षेत्राशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर शिष्टमंडळाने नाशिक परिसराचा अभ्यास करण्यासाठी ’निमा’ला भेट देत उद्योजकांशी थेट संवाद साधला.
 
यावेळी घाना देशाचे इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट सेंटरचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर टेडी गुह, सदस्य फेलिस लार्टी, अलाईस अड्डो यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. घानाच्या शिष्टमंडळाने तेथील औद्योगिक क्षेत्र, विविध क्षेत्रांतील क्षमता, नव्या व्यवसायासाठी असलेला वाव, घाना सरकारचे औद्योगिक धोरण या बाबींची माहिती चित्रफितीद्वारे दिली. भविष्यात उभय देशांतीत संभाव्य सामंजस्य करार, औद्योगिक क्षेत्रातील माहितीचे आदान-प्रदान व उद्योजकांस विस्तारासाठी असलेल्या संधी याबाबतीत सकारात्मक चर्चा झाली.
 
 
यावेळी घाना शिष्टमंडळाद्वारे घानातील औद्योगिक गुंतवणुकीच्या संधींबाबत माहिती देणारी चित्रफीत सादर केली. त्यासोबतच ’निमा’च्या पुढाकाराने उद्योजकांचे शिष्टमंडळाला घानास भेट देण्याचे निमंत्रणही यावेळी देण्यात आले.
 
यावेळी झालेल्या चर्चेत शासन यंत्रणा व त्यांच्या परवानग्या, धोरणांवर शिष्टमंडळाने माहिती घेतली. ’मेक इन इंडिया’ प्रदर्शनाचे आयोजन मुंबईत करण्याबाबतची भूमिकाही समजून घेत समाधान व्यक्त केले. यावेळी ’निमा’तर्फे निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी नाशिकच्या औद्योगिक विकासाची गती व स्थितीची माहिती पाहुण्यांना दिली. नाशिकच्या विकासाच्या पाऊलवाटांवर तयार करण्यात आलेली चित्रफीतही त्यांना दाखविण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष उदय खरोटे, सचिव ज्ञानेश्‍वर गोपाळे, नितीन वागस्कर, गौरव धारकर, नीरज बदलानी, अलियावर इनामदार, ‘टाइम’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुमित तिवारी आदींची उपस्थिती होती. ’निमा’तर्फे ३, ४ व ५ मे २०१८ रोजी मुंबईत आयोजित ‘निमा इंडेक्स २०१८’ या औद्योगिक प्रदर्शनाचे निमंत्रण शिष्टमंडळाला दिले. पाहुण्यांना नाशिक उद्योगांची ओळख असलेली ‘निमा डायरेक्टरी’ भेट देण्यात आली.
भारतीय उत्पादनांच्या अनुषंगाने घाना परिसरात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. त्या ठिकाणी काही बाबींमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आहे तर काही क्षेत्रांत नाशिक अग्रेसर आहे. त्यामुळे उभय पक्षांच्या वाटाघाटी व आदानप्रदानातून दोघांसाठीही नव्या संधी निर्माण होणार आहेत. त्याबाबत उद्योजकांनी प्रत्यक्ष उद्योगांची पाहणी केल्यावरच त्या क्षमता लक्षात येणार आहेत. यासाठी शिष्टमंडळ ‘घाना’ देशाला भेट देऊन उद्योगक्षेत्रांची पाहणी करणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@