‘पोक्सो’च्या काटेकोर अंमलबजावणीसाठी चंद्रपूर जिल्हयात पोलिसांची कार्यशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम


 
चंद्रपूर : राज्य शासनाने यापूर्वीच पारित केलेल्या व केंद्र सरकारने नुकताच त्यात केलेल्या सर्व सुधारणांसह बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या सर्व कलमांची जिल्ह्यामध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज होत आहे. यासंदर्भात काम करणाऱ्या विविध यंत्रणांना याबाबतीत सखोल ज्ञान उपलब्ध करून दिले जात आहे. महाराष्ट्रामध्ये प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्श्युअल ऑफेन्स (पोक्सो) कायद्याचा वापर आणि उपयोग करण्यामध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रेसर करण्याबाबत जिल्हा प्रशासन प्रयत्नरत असून यासंदर्भातील एक कार्यशाळा नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
 
 
जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या ३३ पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले. यामध्ये या कायद्याच्या सर्व तरतुदींची माहिती देण्यात आली. तसेच या कायद्याची अंमलबजावणी करताना मुलांसोबत कशा पद्धतीने व्यवहार करावा, तपासामध्ये मुलांचे सहकार्य कशा पद्धतीने मिळवावे, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. कायद्यातील विविध कलमांची माहिती सुद्धा या प्रशिक्षणात देण्यात आली. यासोबतच अशी घटना घडल्यानंतर पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, पालक आणि मुले यांना पुरवायच्या वैद्यकीय सेवा, महिला पोलिसांची मदत अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात टाटा ट्रस्टच्या मदतीने पोक्सो कायद्याबद्दलची जनजागृती मोहीम सुरू असून यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मुलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात काम करणाऱ्या ‘अर्पण’ समाजसेवी संघटनेची मदत घेतली जात आहे. या संघटनेचे कर्मचारी यासंदर्भातील मार्गदर्शन विविध कार्यशाळांमधून करीत असून पोलीसानंतर या कायद्याशी संबंध येणार्‍या डॉक्टर, वकील आदी व्यावसायिकांची देखील कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@