पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार मन की बातच्या माध्यमातून संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. मन की बात कार्यक्रमाची ही ४३ वी आवृत्ती आहे. सकाळी ११ वाजता नभोवाणी आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल.
 
 
 
 
हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडियो (दूरदर्शन) आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅप्लिकेशनवर प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान कार्यालय, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब चॅनेलवर आणि डीडी न्यूजवर प्रसारित केले जाईल.
 
आपल्या ४२ व्या आवृत्तीत, मोदींनी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या जागरुकतेबाबत जोर दिला होता. देशभरात आरोग्य कल्याण केंद्रांची स्थापना करण्यासाठी व्यापक कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आज ते कोणत्या विषयमावर आपले विचार व्यक्त करतील या विषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
@@AUTHORINFO_V1@@