जयंत पाटील राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाच्या चर्चेला अखेरकार आज पूर्णविराम मिळेला आहे. अनेकांच्या तर्कवितर्काना बाजूला सारत माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रतिनिधींच्या पुणे येथील बैठकीमध्ये आज या विषयी घोषणा करण्यात आली आहे.
सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड करण्यात आल्यानंतर तटकरे यांनी पाटील यांचे नाव नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुचवले होते. याला उपस्थित प्रतिनिधींनी देखील आपला दुजोरा देत, प्रदेशाध्यक्ष पदी एकमताने पाटील यांची निवड केली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाटील यांनी शरद पवार आणि सुनील तटकरे यांची आभार व्यक्त केले. तसेच येत्या निवडणुकांमध्ये पक्षाला बहुमताने विजय करण्याचा संकल्प केला.




दरम्यान परदेशाध्यक्ष पदाबरोबरच पक्षाच्या आणखी काही महत्त्वाच्या पदांसाठी देखील यावेळी निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते नवाब मलिक यांची उपप्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्षपदी अनुक्रमे शिवाजीराव गर्जे आणि हेमंत टकले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सर्वांना पुष्पगुच्छ देऊन त्याच्या सत्कार केला. तसेच भावी वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.





@@AUTHORINFO_V1@@