देशातील प्रत्येक गाव झाले 'प्रकाशमय'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली माहिती 




नवी दिल्ली : देशातील प्रत्येक गावाला शंभर टक्के वीज पुरवठा देण्याविषयी केंद्र सरकारने दिलेले आश्वासन आज पूर्ण झाले आहे. देशातील सर्व गावांना वीजपुरवठा देण्याचे सरकारचे ध्येय आता पूर्ण झाले असून देशातील प्रत्येक गाव हे अंधारमुक्त झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींनी याविषयी घोषणा करत आज क्षण आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून म्हटले आहे कि,२८ एप्रिल हा देशाच्या विकासाच्या इतिहासतील एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. भारत सरकारने दिलेले 'शंभर टक्के वीज पुरवठ्याचे आश्वासन आज पूर्ण झाले. देशातील सर्व गावांना वीज पुरवठा देण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.' तसेच देशात १०० टक्के वीजपुरवठा आता सुरु झाला असल्याची घोषणा करताना आपल्याला अत्यंत आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


तसेच यासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार देखिल त्यांनी व्यक्त केले आहेत. 'देशातील त्या प्रत्येक घटकाचे मनापासून आभार ज्यांनी देशातील गावांना अंधार मुक्त करण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहे. त्यांच्या या अखंड प्रयत्नांमुळेच आज देशाला अंधारमुक्त करण्याचे सरकारचे स्वप्न पूर्ण होऊ शकले आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी देखील या वृत्ताला दुजोरा देत, या घटनेवर आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने दिलेल्या वेळेच्या अगोदरच आपला आश्वासन पूर्ण केले आहे. जनतेने सरकारवर टाकलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे, असे गोयल यांनी म्हटले आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१५ मध्ये देशातील १८०० गावांना वीजपुरवठा देण्याचा संकल्प केला होता. लाल किल्ल्यावर आपल्या भाषांमधून सरकार देशातील गावांना वीज पुरवठा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षांच्या काळामध्ये सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. त्यामुळे देशातील नागरिकांकडून देखील यावर आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच सरकारच्या कार्याचे कौतुक देखील केले जात आहे. 

 
@@AUTHORINFO_V1@@