'तिहेरी तलाक विधेयका'ला विरोध नको !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |
 

मुंबईतील आणखी एका तिहेरी तलाक पिडीतेची समाजाला साद 

'मुस्लीम महिलांनी स्वतःचे हित ओळखावे'



(प्रतिकात्मक छायाचित्र )
मुंबई : इस्लाम आणि तिहेरी तलाकच्या नावावर सुरु असलेले मुस्लीम महिलांचे शोषण काही केल्या थांबायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकला अवैध्य ठरवल्यानंतर देखील मुंबईमधील एका मुस्लीम पुरुषाने आपल्या पत्नीला तिहेरी तलाकच्या माध्यमातून घटस्फोट दिला आहे. पतीने घेतलेल्या या अविचारी निर्णयाविरोधात पिडीत महिलेनी देखील मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्र सरकारने तयार केले तिहेरी तलाक विधेयक हे मुस्लीम महिलांच्या हिताचे आहे, त्यामुळे मुस्लीम समुदायातीलच काही महिलांकडून याला होणार विरोध बंद झाला पाहिजे, तसेच विरोधकांनी देखील हे विधेयक पारित करावे, असे आवाहन तिने केले आहे.

मुंबईमध्ये राहणाऱ्या फरहनाज खान या महिलेचे २०१२ मध्ये यन्वर खान नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. परंतु हुंड्यासाठी नवरा आणि सासरच्या मंडळींकडून फरहनाजला वारंवारपणे जाच केला जात होता. यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी यन्वरने तिला व्हॉट्सअॅपच्या माध्यामतून एक व्हिडीओ पाठवला आणि त्यामध्ये तीन वेळा 'तलाक' म्हणत तिला घटस्फोट दिल्याचे जाहीर केले. यानंतर फरहनाजने आई-वडिलांच्या सहमतीने ठाणे न्यायालयात या विरोधात धाव घेतली. परंतु आता या विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. दरम्यान सरकारने तयार केलेल्या तिहेरी तलाक प्रथेवरील विधेयक लवकरात लवकर पारित व्हावे, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे. तसेच या विधेयकाला मुस्लीम समुदायाने आणि विरोधकांनी विरोध करणे बंद करावे, असे देखील तिने म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@