भारतीय खेळाडूंच्या यशावर मला अभिमान आहे : 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली :  एक काळ होता जेव्हा आज भारतातील कुठले खेळाडू खेळतील असा प्रश्न विचारला जायचा मात्र आता असा काळ आला आहे, की लोक विचारतात आज आपल्या खेळाडूंनी किती पदके जिंकली. राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले आहे. भारतीय खेळाडूंच्या यशावर मला अभिमान आहे, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केल्या. मन की बात कार्यक्रमाच्या ४३ व्या भागात आज ते बोलत होते.
 
 
 
यावेळी त्यांनी महिला खेळाडूंचे विशेष कौतुक केले तसेच, राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. देशातील खेळाडू देशाच्या विविध भागांमधून अनेक समस्यांना पार करून, अनेक कष्ट सहन करून आले आहेत, त्यांनी देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावले असेही ये यावेळी म्हणाले.
 
 

 
'फिट इंडिया' अभियानात देशाचा उत्तम सहभाग :

दरम्यान त्यांनी गेल्या महिन्यातील मन की बात कार्यक्रमात 'फिट इंडिया' या अभियानांतर्गत देशावासियांना केलेल्या आवाहनाबद्दल सांगत ते म्हणाले की, संपूर्ण देशाने मोठ्या प्रमाणात या अभियानात सहभाग नोंदवला आहे, तसेच त्यांनी अभिनेता अक्षय कुमार याची प्रशंसा करत या अभियानात त्याचा देखील मोठा सहभाग असल्याचे सांगितले.





नवयुवकांना 'स्वच्छ भारत समर इंटर्नशिप' मध्ये भाग घेण्याचे आवाहन :

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नवयुवकांना 'स्वच्छ भारत समर इंटर्नशिप' मध्ये भाग घेण्याचे आवाहन केले. यामध्ये उत्तम काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्न म्हणून घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. २ ऑक्टोबर २०१८ रोजी महात्मा गांधी यांच्या सार्धशती निमित्त आपण देशासाठी काहीतरी चांगले करु शकलो याचे समाधान यावेळी विद्यार्थ्यांना मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले. 



 
जलसंरक्षणाविषयी जागरुकता :

यावेळी त्यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना पाणी संरक्षाणाचे महत्व समजावून सांगितले. तसेच "येत्या काळात पाण्यावरुन युद्ध होणार असे म्हणतात ते काही खोटे नव्हे." असेही ते यावेळी म्हणाले. आपण सर्वांनी मिळून पाणी वाचवले पाहीजे, असेही त्यांनी यांवेळी सांगितले.
 
 
 
 
रमजान आणि बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा :

यावेळी त्यांनी देशवासियांना येत्याकाळात य़ेणाऱ्या रमजान आणि बौद्ध पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या, तसेच देशात एकत्र खेळीमेळीने राहत शांतता स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी देशवासियांना केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@