त्रिपुरा मुख्यमंत्र्यांना मोदींनी दिली समज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |

वादग्रस्त वक्तव्यांमुळे दिल्लीत येऊन भेटण्याचे निर्देश



नवी दिल्ली : त्रिपुरा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या वादग्रस्त विधानांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देब यांना समज दिली आहे. तसेच येत्या २ तारखेला दिल्लीत येऊन आपली आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेण्याचे आदेश देखील देब यांना दिले आहेत. 

गेल्या महिन्याभरात देब यांनी सलग चार वेळा वादग्रस्त विधान करून नव्या राजकीय वादांना तोंड फोडले होते. प्रथम त्यांनी इंटरनेट आणि महाभारत यांच्यावर आपले मत मांडत इंटरनेट हे महाभारत काळात देखील अस्तित्वात होते, असे विधान केले होते. यामुळे सोशल मिडीयावर भाजपला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते. त्यानंतर त्यांनी माजी विश्वसुंदरी डायना हायडन हिच्या संबंधी वादग्रस्त विधान केले होते. यावर नागरिकांकडून टीका सुरु असतानाच त्यांनी मॅकॅनिकाल इंजिनिअर विद्यार्थांनी सिविल सर्व्हिसमध्ये येऊ नये, तसेच तरुणांनी नोकरी शोधण्याऐवजी पान टपरी टाकावी, अशी एकामागून एक वादग्रस्त विधाने केली होती.

देब यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मिडीयावर भाजपला मोठ्या प्रमाणात लक्ष केले जात होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः देब यांना समज देत, वादग्रस्त विधाने टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दिल्लीत येऊ शाह यांच्याशी देखील याविषयी चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@