'अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |

पालकमंत्री रणजीत पाटील यांचे आश्वासन

 मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गत शहरात विविध विकास कामांचे भूमीपूजन 




अकोला : ' सरकारच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अकोला शहराचा सध्या झपाटयाने कायापालट होत आहे. यापुढेही शहराच्या अशाच प्रकारे सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी प्राप्त करुन घेतला जाईल. तसेच शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री रणजीत पाटील यांनी आज दिली. अकोला महानगर पालिका हददीतील विविध विकास कामांचे भूमीपूजन आज पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यातील इतर विकसित शहरांप्रमाणे अकोल्याचा देखील विकास साधण्यासाठी मागील तीन वर्षांत मोठया प्रमाणात निधी प्राप्त करुन घेण्यात यश आलेले आहे. या निधीच्या माध्यमातून शहराचा झपाटयाने विकास होत आहे. आगामी काळातही जास्तीत जास्त निधी प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जिल्हयात प्रभावीपणे राबविल्या जातील, असे ते यावेळी म्हणाले.

शहरातील प्रभाग क्र. १३ मधील एकूण तीन रस्त्यांचे क्रॉक्रिटीकरण तसेच आसपासच्या काही पायाभूत सुविधांचे मिळून एकूण २५ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजूरी मिळाली आहे. त्या अंतर्गत शहरात विविध विकास कामांचे भूमीपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक आशिष पवित्रकार, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेष चव्हाण हे उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@