नगर येथे पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांड, जामखेड बंदची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |
 
 
 
अहमदनगर :  अहमदनगर येथे पु्न्हा एकदा दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना घडली आहे. जामखेड येथे गोळीबार करुन दोन तरुणांची हत्या करण्यात आली, यामुळे संपूर्ण नगर हादरून गेले आहे, नगर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
योगेश आणि राकेश राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या भावांची नावे आहेत. योगेश राळेभात राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेचे जिल्हा सरचिटणीस होते. दोन्ही भावांना जामखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यात त्यांचा मृत्यु झाला.
 
 
 
 
मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. गोळीबार कोणी आणि का केला याबाबतचा तपास सुरु आहे. मात्र अद्याप कुठलीच माहिती मिळू शकलेली नाही.
संपूर्ण प्रकरणामुळे जामखेड येथे नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे, तसेच येील नागरिकांनी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेने जामखेड बंद ठेवण्याची मागणी केली आहे.
पालकमंत्री राम शिंदे यांनी रुग्णालयात भेट दिली. यावेळी संतप्त जनतेने आपला आक्रोश त्यांच्यासमोर व्यक्त करत घोषणाबाजी केली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. वातावरण अधिक तापू नये यासाठी पालकमंत्र्यांना रुग्णालयातून पाठवण्यात आले.पूर्व वैमनस्यातून ही हत्या केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

एकाच महिन्यात दुसरं हत्याकांड :

एकाच महिन्यात नगर येथे दुसर्‍यांदा दुहेरी हत्याकांड झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.. केडगाव पाठोपाठ आता जामखेडला अज्ञातांनी राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या केल्यामुळे नगर येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जामखेड मार्केट यार्ड येथे काल संध्याकाळी ७ च्या दरम्यान योगेश आणि राकेश हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी दोघांनी खाली उतरुन त्यांच्यावर अंधाधुंध गोळीबार केला. सात ते आठ गोळ्या छातीत झाडल्याने गंभीर दुखापत होऊन योगेश आणि राकेश खाली कोसळले. शेजारीच लग्नाच्या डिजेचा दणदणाट असल्याने गोंधळातच गर्दीत गोळ्या झाडल्या. यावेळी काही नागरिकांनी दुचाकीस्वारांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र हवेत गोळ्या झाडून मारेकरी फरार झाले. मारेकऱ्यांनी तोंड बांधले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.
@@AUTHORINFO_V1@@