नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
वुहान : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात आज ऐतिहासिक भेट घेतली जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या चीनच्या दौऱ्याचा आजचा दुसरा असून आज त्यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली. ईस्ट लेक नौकेत विहार करत नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग चर्चा करीत आहेत. भारत आणि चीन यांच्यात होणारी ऐतिहासिक औपचारिक बैठक याच नौकेत पार पडत आहे. यावेळी नरेंद्र मोदी शी जिनपिंग यांच्यासोबत एका महत्वाच्या कागदपत्राच्या सहाय्याने चर्चा करीत आहेत. 
 
 
 
 
 
भारत आणि चीन यांच्यात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर एका आराखड्याच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यापार, सुरक्षा, सीमावाद या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली असून ही चर्चा सकारात्मक ठरली आहे. नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची ही भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या भविष्याच्या दृष्टीने ही भेट फायदेशीर ठरणार आहे. 
 
 
 
 
 
भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंध काही प्रमाणात नाजूक असल्याने या संबंधांना ही भेट नवीन वळण देईल असे म्हणण्यास काहीही हरकत ठरणार नाही. भारताने चीन विषयी नेहमीच सौम्य भूमिका घेतली आहे. चर्चेच्या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवावे ही भूमिका नेहमी भारताची राहिली आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्या चर्चेने या संबंधांना नवीन वळण येते काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
@@AUTHORINFO_V1@@