जामनेरच्या उपनगराध्यक्षपदासाठी अनेकांमध्ये चढाओढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |

प्रा.शरद पाटील, महेंद्र बाविस्कर यांची नावे आघाडीवर

जामनेर ;
नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कुणाला संधी मिळते?...याची चर्चा रंगत आहे. पालिकेतील दुसर्‍या क्रमांकाच्या या पदासाठी सध्यातरी भाजपमध्ये नुकतेच प्रवेश नगरसेवक प्रा.शरद पाटील आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते , माजी गटनेते महेंद्र कृपाराम बाविस्कर यांची नावे सध्या तरी आघाडीवर दिसतात.
 
 
नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या चवथ्या सार्वजत्रिक निवडणुकीमधे भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळत पक्षाला लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह(साधना महाजन)सर्वच्यासर्व पंचवीस जागांवर विजय मिळाला. त्यामुळे नगरसेवकांची संख्या जास्त तर इच्छुक अनेक... यामुळे या महत्त्वपूर्ण पदासाठी एकाचीच निवड होणार. पहिल्यांदा निवडणूक लढवत जिंकणारेही बहुतांश नगरसेवक आहेत, त्यांनीही आपली वर्णी लागावी म्हणून जोरदार‘फिल्डींग’ लावल्याचे दिसते.
 
 
मराठा, माळी आणि मुस्लीम समाजाकडून पालिका निवडणुकीमध्येे मोठया प्रमाणात राजकीय गाणिते मांडण्यात आली. तर याच तिन्ही समाजांनी अशा धृवीकरणाच्या प्रकाराला थारा न देता आपले कर्तव्य पार पाडल्याचेच दिसून आले.
 
 
आता उपनगराध्यक्षपदासाठी यातील कोणत्या समाजाला पहिल्या वर्षी अशी संधी मिळत, याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे. अर्थात मंत्री गिरीश महाजन हेच काय ते निर्णय घेतील आणि तो अचूक असेल, असा विश्‍वासही जुनेजाणते व्यक्त करीत आहेत.
 
सामाजिक गणिताला महत्त्व
येत्या वर्ष-दीड वर्षात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. या पार्श्वभुमीवर शहरासोबतच मतदार संघातही या पदाचा भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त लाभ कसा होईल, त्या दृष्टीने सर्वसमावेशक अशा चेहर्‍याची निवड होणार असल्याचे समजते.
@@AUTHORINFO_V1@@