भारतीय रुपया ६८ च्याही खाली जाण्याची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |
 

रुपयाचा रेफरन्स रेट जाहीर करण्याचीच रिझर्व बँकेची भूमिका ना
ऊसाचे उत्पादन घटविण्या चा साखर कारखान्यांचा शेतकर्‍यांना सल्ला!

 

निफ्टी वर्षाअखेर ११ हजार ५०० बिंदूंवर जाणार?
निर्यात करणार्‍या कंपन्यांना अवमूल्यनाचा फायदा
 
भारतीय रुपयाचे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवमूल्यन होत आहे. अर्थात हा विनिमय बाजारा(एक्सचेंज मार्केट)चा भाग असल्याने यावर कुठलाही उपाय तूर्त नाही. भारतीय रिझर्व बँकही यात हस्तक्षेप करण्याच्या स्थितीत नाही. फक्त रुपयाचा संदर्भ दर (रेफरन्स रेट) जाहीर करण्यापलीकडे तिची सध्या तरी काहीही भूमिका राहिलेली नाही. याच्या परिणामी देशाच्या चलनावरील दबाव वाढतच जाणार असून एखाद्या वेळी रुपया प्रति डॉलरमागे ६८ रु. खालीही जाऊ शकतो असे भाकित तज्ञांनी केले आहे.
 
रुपयाच्या अवमूल्यनामागे अमेरिकन कोषागारा(ट्रेझरी)च्या मिळकतीत झालेली तीन टक्के वाढ व डॉलर मजबूत होणे यासह अनेक कारणे आहेत. भारतीय रुपया यावर्षी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाच टक्के घसरलेला आहे. तो आणखी कमी होऊन ६८ रुपये प्रति डॉलर इतका होऊ शकतो.
 
 
रुपयाच्या अवमूल्यनामुळे काही कंपन्यांचा तोटा तर काहींचा फायदा होऊ शकतो. ज्या कंपन्यांनी डॉलरमध्ये कर्ज उचललेले आहे त्यांना परत फेडीसाठी जास्त रक्कम रुपयांमध्ये भरावी लागणार असल्याने त्यांना नुकसान सोसावे लागणार आहे. पण ज्या कंपन्या माल व सेवांची निर्यात करणार्‍या त्यांना फायदा होणार आहे.
 
 
बुधवारी २६ रोजी रुपया ६६ रु.९० पैसे प्रति डॉलर वर बंद झाला. या पातळीवर रुपया गेल्या वर्षीच्या पातळीवर आलेला होता. आयात-निर्यात व्यापारा तील तूट वाढण्याची भीती, अमेरिकन फेडरल बँकेकडून होत असलेली व्याजदर वाढ आणि कच्च्या खनिज तेलाच्या ७५ डॉलर प्रति पिंपपर्यंत चढलेल्या किंमती यामुळे भारतीय रुपयावर सतत दडपण येत आहे. तो प्रति डॉलर ६८ रुपयांपर्यंत जाण्याची दाट शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
 
सध्या देशात निवडणुकांचे वातावरण निर्माण होत आहे. यादृष्टिने केंद्र व राज्यातील सत्ताधारीसह सर्व विरोधकांनी कंबर कसली असून राजकीय हालचालींना प्रारंभही केला आहे. कच्च्या खनिज तेलाच्या किंमती सतत चढ्या असल्या तरीही तेल पणन(ऑईल मार्केटिंग) कंपन्यांच्या शेअर्सचे भाव एवढ्या सहजासहजी वाढणारे नाहीत. गुंतवणुकदारांनी ऑईल व ऑईल डेरिवेटिव्ह सेक्टरपासून सावध राहण्याची गरज आहे. चौथ्या तिमाहीचे निकाल बाजाराची पुढील दिशा ठरविणारे असतील. तज्ञांच्या म्हणण्यानुसार हे निकाल समाधानकारक राहतील. नजीकच्या काळात बाजार थोडा विशिष्ट मर्यादेत (रेंजबाउंड) राहण्याची शक्यता असली तरीही त्याची एकंदरीत कामगिरी खूप चांगली राहण्याची शक्यता असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी या वर्षाअखेर ११ हजार ५०० बिंदूंची पातळी गाठू शकतो. चौथ्या तिमाहीत विमान वाहतूक कंपन्यांचे निकाल खराब राहणार असले तरी प्र्रदीर्घ काळासाठी या कंपन्यांची कामगिरी सुधारणार आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रही चांगले वाढणार आहे. बँकिंग क्षेत्रात भारतीय स्टेट बँक, आयडीबीआय बँक व कोटक बँक यांना तज्ञांची पसंती राहणार आहे.
 
 
पण काही तज्ञांच्या मते मात्र निफ्टी १० हजार ते ११ हजार बिंदूंच्या आतच राहण्याची शक्यता आहे. निफ्टीला १० हजार बिंदूंवर चांगला आधार (सपोर्ट)आहे. देशांतर्गत आणि जागतिक अर्थव्यवस्थेत आता सकारात्मक बदल होत आहेत. अशातच गुंतवणुकदारांनी ग्राहक व्यवहार व स्वयंचलित वाहन आणि धातू तसेच बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रा(एनबीएफसी)तील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्लाही तज्ञांनी दिला आहे. ऍक्सिस बँकेसंदर्भात काही प्रमाणात अनिश्‍चितता कायम असली तरी बँकिंग क्षेत्रात कोटक बँक, इंडसइंड बँक आणि एचडीएफसी बँक यांच्यामध्ये गुंतवणुकीस चांगला वाव आहे.
 
 
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरु असून प्रचारमोहिमेने आतापासूनच वेग पकडलेला आहे. या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला गमावण्यासारखे काहीही नसले (नथिंग टू लूझ) तरी तो राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला तर मात्र त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम होईल. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ११ हजार बिंदूंची पातळीही गाठू शकतो.
 
 
देशात यावर्षी साखरेचे सव्वा तीन कोटी टन इतके विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता असून ते साखरेच्या खपापेक्षा ६५ लाख टनांनी जास्त आहे. त्यामुळे साखरेचे भाव कोसळले असल्याने साखर कारखानदारांनी शेतकर्‍यांना ऊसाचे उत्पादन घटविण्याचा सल्ला दिला आहे.
सेन्सेक्सचा ३५ हजार, निफ्टीचा १० हजार ७०० बिंदूंच्या पातळीला स्पर्श
आज शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात भरघोस वाढ झाली. संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी यांनी अनुक्रमे ३५ हजार व १० हजार ७०० बिंदूंची पातळी पुन्हा गाठली होती. दिवसअखेरीस सेन्सेक्स, निफ्टी या पातळीच्या थोडा खाली येत अनुक्रमे ३४ हजार ९६९ बिदू व १० हजार ६९२ बिदूंवर बंद झाले. भारतीय रुपयाचे उर्ध्वमूल्यन होऊन त्याची किंमत २४ पैशांनी वाढून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ६६ रुपये ६६ पैशांपर्यंत गेली होती. भारतीय रिझर्व बँकेने मात्र रुपयाचा रेफरन्स दर ६६ रुपये ७८ पैसे इतका ठेवला होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड (टीसीएस)चा शेअर बुधवारच्या तुलनेत ८७ रुपयांनी घटून ३४५१ रुपयांवर बंद झाला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@