‘तभा’चे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र दाणी यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |

राहुल रनाळकरण, नितीन केळकर, विमल मिश्र, स्वाती तोरसेकर यांचाही समावेश

 
 
मुंबई :
विश्व संवाद केंद्रातर्फे नारद जयंतीच्या औचित्याने देण्यात येणार्‍या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारासाठी यावर्षी ज्येष्ठ पत्रकार म्हणून तरुण भारत असोसिएट्सचे कार्यकारी संचालक रवींद्र दाणी यांची घोषणा झाली असून येत्या ४ मे रोजी सायं. ६.३० वा. माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात त्यांना केंद्रीय रस्ते निर्माण आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
 
 
त्यांच्या सोबतच पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल डॉ.राहुल रनाळकर (मुंबई आवृत्ती संपादक, लोकमत), राष्ट्रीय भाषेतील पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी विमल मिश्र (मुख्य वार्ताहर, नवभारत टाईम्स), इलेक्ट्रॉनिक आणि ब्रॉडकास्टिंग मीडियासाठी नितीन केळकर (उपसंचालक - वृत्तसेवा, पुणे आकाशवाणी), सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून मोहन बने (मुक्त छायाचित्रकार) आणि सोशल मीडिया व ब्लॉगिंगसाठी स्वाती तोरसेकर swatidurbin.blogspot.in या सामरिक विषयांवरील ब्लॉगच्या लेखिका) यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
 
 
पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पत्रकारांना गेल्या १८ वर्षांपासून विश्व संवाद केंद्रातर्फे आद्य वार्ताहर देवर्षी नारद यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
 
 
यावेळी केंद्राच्या वतीने आयोजित पत्रलेखन स्पर्धेच्या विजेत्यांनाही पुरस्कार देण्यात येतील. तसेच पत्रलेखकांच्या निवडक पत्रांचे संकलन असलेल्या ‘पत्रसामर्थ्य’ या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@