रेल्वे तिकीट खिडकीच्या कर्मचार्‍यांच्यासतर्कतेमुळे महिलेस परत मिळाली पर्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |
 
 
 
रेल्वे तिकीट खिडकीच्या कर्मचार्‍यांच्या
सतर्कतेमुळे महिलेस परत मिळाली पर्स
भुसावळ, २८ एप्रिल
साधारणत: एखादी वस्तू हरवली की ती पुन्हा मिळण्याची शक्यता फार कमी असते, आणि त्यात रेल्वेस्थानकावर वस्तू विसरल्यास ती परत मिळण्यास नशिबच हवे. असा सर्वांचा अनुभव आहे. मात्र, शनिवारी भुसावळ रेल्वेस्थानकावर पर्स विसरुन गेलेल्या मुंबईच्या एका महिलेला रेल्वे कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे पर्स परत मिळण्याचा चमत्कार घडला.
शनिवारी रेल्वे स्थानकाच्या दक्षिण दिशेला तिकीट खिडकी क्र. ९ वर शेळके आणि खिडकी क्र. ७ वर मिलिंद साळुंके सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत कर्तव्यावर उपस्थित होते. दरम्यान एक महिला शेळके यांच्या खिडकीवर येवून तिकीट काढताना आपली पर्स तेथेच विसरून गेल्या. थोड्यावेळाने शेळके यांनी त्या महिलेची पर्स खिडकीमधून आत घेतली. बराचवेळ वाट पाहूनसुध्दा ती महिला पर्स घेण्यासाठी परत न आल्याने सहकारी मिलिंद साळुंखे यांच्याद्वारे पर्सची तपासणी केली केली असता त्यात काही रोकड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, एटीएम कार्ड, आधारकार्ड, बँकेची पावती आदी कागदपत्रे मिळाली. परंतु यात त्या महिलेचा संपर्क क्रमांक मिळाला नाही. पण एटीएमच्या रोख काढण्याच्या पावतीवर भ्रमणध्वनी क्रमांक मिळून आला.
त्यावर त्यांनी संपर्क साधला असता मुंबई येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकारी शिल्पा भगत यांची ती पर्स असल्याचे स्पष्ट झाले. या संपर्कामुळे त्यांची पर्स सुरक्षित असल्याचे त्यांना कळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करून शेळके यांचे आभार व्यक्त केले. शिल्पा भगत यांनी भुसावळ येथे वीज वितरण विभागात कार्यरत असलेल्या त्यांची मैत्रिण निशा चौधरी यांना शेळके यांच्याकडून पर्स ताब्यात घेण्यासाठी पाठविले.
वरिष्ठ बुकिंग अधिकारी हुना कोळी यांच्या उपस्थितीत निशा चौधरी यांना शिल्पा भगत यांची पर्स ताब्यात देण्यात आली.
 
@@AUTHORINFO_V1@@