लोहटारच्या शेतकर्‍याच्या कापसाचे पैसे दिलेच नाहीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |

पाचोर्‍याला जिनिंग मालकाविरुद्ध फसवणुुकीचा गुन्हा दाखल

पाचोरा :
विश्‍वासघात व फसवणूक प्रकरणी कापूस खरेदीदाराविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, भारत नरहर सोमपूरकर (वय ६१, रा. लोहटार) यांनी आपला कापूस ५ मे २०१७ रोजी शेख हकीम शेख गणी रा.तिडका ता. सोयगाव जि. औरंगाबाद या कापूस व्यापार्‍यास विकला होता, ५० लाख १० हजार १५६ पैकी शेख हकीमने प्रथम ३ लाख ३० हजार १५६एवढी रकम दिली होती व बाकी रकम चेकने देतो असे सांगून दि.१५ मे २०१७ रोजी सकाळी११ वाजता १ लाख ८० हजाराचा चेक चंद्रकांत नटवरलाल शहा यांच्या नावाने दिला होता.
 
 
चेक हा भारतीय स्टेट बँक शाखेचा नं.८२३१३९ असा असून चेक देणार्‍याचे अकाउंट नं.१०६८२४३७२२३ असून चेक देणारे हे श्रीराम कॉटन जिंनिंग फॅक्टरी कलेडीया (ता.सनखेडा जि. वडोदरा गुजरात) हे आहेत. हा चेक वटला नाही, नंतर अनेकवेळा तगादा केला असता केवळ देतो देतो, असे सांगून आज पर्यंत पैसेच दिले नाहीत. पैशासाठी ४/५वेळा कलेडीया येथे त्यांच्या घरीही फिर्यादी जाऊन आले परंतु पैसे दिले नाहीत.
 
 
विश्वासघात व फसवणुकीची फिर्याद भारत नरहर सोमपूरकर यांनी पाचोरा पोलिसात दिल्याने आरोपी विरुद्ध कलम४२०,४०६ नुसार गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. कॉँ. अजय मालचे व प्रदीप चांदेलकर करीत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@