विकास आराखडा २०३४ , जकात नाक्यावर इंटरसिटी ट्रान्सपोर्ट हब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |
 
 

 
 
पालिकेच्या तिजोरीत भर पडणार 
 
विकास आराखड्यातील सूचनेला शासनाची मान्यता 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या बंद झालेल्या जकात नाक्यांच्या जागेवर इंटरसिटी ट्रान्सपोर्ट हब उभारले जाणार आहेत. नवीन विकास आराखड्यात पालिका प्रशासनाच्या सूचनेला मान्यता मिळाली असून याबाबत अधिसूचना जाहीर झाल्यावर प्रत्येक जकात नाक्यांवर त्याची अमंलबजावणी केली जाईल यामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडेल , असे विकास नियोजन उप अभियंता विवेक मोरे यांनी सांगितले.
 
 
 
जकात हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. जकातीमधून पालिकेला दरवर्षी सात हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. जीएसटी लागू झाल्यानंतर हे उत्पन्न मिळणे बंद झाले. मुंबईमध्ये ठाणे- मुलुंड पूर्व द्रुतगती मार्ग, ठाणे- मुलुंड एलबीएस मार्ग , एेरोली नाका, पनवेल, दहिसर चेक नाका पाच जकात नाके आहेत.
 
 
 
 
या नाक्‍यांची शेकडो एकर जमीन आहे. ही जागा पालिकेच्या मालकीची असून जकात रद्द होवून जीएसटी लागू झाल्याने त्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. या जागांवर अतिक्रमणे वाढू नयेत, यासाठी पालिकेने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी व कमर्शिअलसाठी त्या जागांचा वापर करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना पालिका प्रशासनाने विकास आराखड्यात मांडली होती. शासनाने या सूचनेला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे जकात नाक्यांच्या जागेवर इंटरसिटी ट्रान्सपोर्ट हब स्थापन करण्यात येणार आहे. नव्या २०१४-३४ च्या विकास आराखड्यात नमूद केले आहे. राज्य शासनाकडून त्यानुसार अधिसूचनेत बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती मोरे यांनी दिली. इंटरसिटी ट्रान्सपोर्ट हबचे बांधकाम पालिका किंवा शासनाच्या अधिसुचनेतील बदलानुसार खासगी विकासक करु शकतो, असे ते म्हणाले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@