भाजपच्या महाआरोग्य शिबिराचे थाटात उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |
 

 
जळगाव :
भारतीय नरेंद मोदी संघातर्फे २७ ते २९ या कालावधीत खान्देश सेंट्रल मॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे शुक्रवार २८ रोजी खा. ए.टी.पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष मनोज तोमर, गुरु शंकराचार्य यांच्या शिष्या गुरुमा सोनिया, आ. सुरेश भोळे, आ. स्मिता वाघ उपस्थित होते.
 
 
या शिबिरात ९३७० गरजूंची विविध तपासणी करण्यात आली. यात नेत्रतपासणीचे २५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. २७ ते २९ दरम्यान खान्देश सेंट्रल मॉल येथे सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत विविध आजारांवर मोफत तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केेले आहे.
 
 
या शिबिरासाठी प्रदेशध्यक्ष अनिल पगारिया, सुरेशसिंग सूर्यवंशी, केमिस्ट महासंघाचे प्रदेशाध्क्ष निशिकांत मंडोरा, डॉ. प्रियंका सोनी, दिनेश बोरा, अजय जोशी, महानगर अध्यक्ष पंकज जैन, सचिन बाविस्कर, वैशाली पाटील, मनिषा जोशी, सरोज पाठक, भारती पाटील, जिनल जैन, पंकज शर्मा, गणेश पाटील, सचिन जांगडा परिश्रम घेत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@