पारोळ्यात सलग आठवी चोरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |
 
 
पारोळ्यात सलग आठवी चोरी
पारोळा, २८ एप्रिल

शहरातील भीमराव जीवराम पाटील हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. ते लग्नानिमित्त खामगाव येथे गेले असता घरी मुलगा प्रशांत एकटाच होता. परंतु तो कामानिमित्ताने २७ रोजी ७ च्या सुमारास मुंबईसाठी रवाना झाला. निघताना त्यांनी कुलूप व्यवस्थित लावल्याची खातरजमा केली. तसे वडील भीमराव पाटील यांनाही कळविले होते. भीमराव पाटील घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा वाकवून, कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १२ हजार रुपये किमंतीची सोन्याची अंगठी व ३ हजारांची रोकड असा एकूण १५ हजार रुपायांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक विलास सोनवणे, पो.हे.कॉं.बापू पाटील, पो.कॉं.राहुल चौधरी, सुधीर चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले. नंतर श्वानपथक, फिंगरफ्रिन्ट पथक यांनाही पाचरण करण्यात आले. भीमराव पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो.हे.कॉं.बापू पाटील करीत आहे.
चोरट्याचा वाढता उपद्रव
ही आठवी घटना असल्याने चोरट्याचा वाढता उपद्रव लक्षात घेता पोलीस प्रशासनाने रात्रीचे गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@