पाचोर्‍यात शितपेय विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |
 
 
 
पाचोर्‍यात शितपेय विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
पाचोरा, २८ एप्रिल
दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. उष्णतेपासून काही प्रमाणात गारवा मिळविण्यासाठी नागरिक शितपेयाचा आस्वाद घेतात. त्यामुळे शितपेयाच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. याचा गैरफायदा विक्रेते घेत असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. आरोग्य विभाग याबाबत मौन बाळगून असल्याचे जाणवते.
तप्त उन्हात लस्सी, आईस्क्र्रिम, ताक अशा अनेक दुग्धजन्य शितपेयांची मोठी विक्री होत आहे. तालुक्यात आलेल्या परप्रांतीय विक्रेत्यांकडून या पदार्थांची ठिकठिकाणी विक्री करण्यात येते आहे. उन्हाळ्यात दुधाची आवक कमी होते. तसेच दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी अधिक असते. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी पुरेसे मुबलक दूध मिळत नसल्याने. दुधाची पूर्तता करण्यासाठी आणि कमी खर्चात जास्त नफा कमावण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी रसायने व हलक्या प्रतीची दूध पावडर तसेच तत्सम सामुग्रीचा वापर केला जातो. रसायनांचा वापर करून दूध बनविलेले असते, पदार्थांची उघडपणे विक्री करुन भरघोस नफा विक्रेते कमवत आहे. पण ग्राहकांच्या जीवाशी मात्र खेळले जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाने याकडे कानाडोळा केला असल्याने विक्रेत्यांचे फावत आहे. दुधाची आवक कमी आहे आणि मागणी अधिक असतांना शितपेये विक्रेते दूध कोठून उपलब्ध करून घेतात याची माहिती घेण्याची तसदीसुध्दा हा विभाग घेत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
जनतेच्या आरोग्यासाठी हे पदार्थ घातक असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. या गैरप्रकारांना अन्न व औषध प्रशासन पायबंद घालेल का ? असा प्रश्न करीत कुंभकर्णी झोपेतल्या अन्न व औषध प्रशासनाने भेसळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@