शाश्वत सिंचनासाठी अभियानांतर्गंत कामांना वेग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |
 
 
 
शाश्वत सिंचनासाठी अभियानांतर्गंत कामांना वेग
जळगाव, २८ एप्रिल
जिल्ह्यातील शेतकरी सुजलाम्-सुफलाम होण्यासाठी शासनाने विविध योजनांद्वारे कामांवर भर दिला आहे. महत्त्वाच्या योजनांमधून शासन त्यावर कोट्यावधींचा निधी खर्च करत आहेत. जिल्ह्यात शाश्वत सिंचन वाढीसाठी अभियानातर्ंगत कामांना वेग दिला आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सर्व यंत्रणांच्या अधिकार्‍यांना कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान, वृक्ष लागवड मोहीम, जलयुक्त शिवार अभियान यांचा समावेश आहे. तसेच १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान ग्रामस्वराज्य अभियान आणि १ मे रोजी महाश्रमदान दिन या कामांचा समावेश आहे. अभियानातर्ंगंत राबविल्या जाणार्‍या सर्व योजनांचा शेतकर्‍यांना लाभ होत आहे.
 
मुख्यमंत्र्यांकडून जलयुक्ताचा आढावा
मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानासह इतर योजनांबाबत राज्यातील जिल्हाधिकार्‍यांकडून व्हिसीव्दारे आढावा घेतला. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी योजनांबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तिसर्‍या टप्प्यातील कामेे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तिसर्‍या टप्प्यातील ४८ टक्के कामे पूर्ण झालेले आहेत. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत दोन हजार उद्दिष्टांपैकी १ हजार ८२४ शेततळी खोदली आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील ७ केंद्रीय योजना
ग्राम स्वराज अभियानातून १४ एप्रिल ते ५ मे पर्यंत राष्ट्रीय स्तरावरील योजनांच्या अंमलबजावणीसाठी ही विशेष मोहीम आहे. प्रधानमंत्री-उजाला योजना, उज्ज्वला योजना, सहज बिजली हर घर योजना, जनधन योजना, जीवनज्योती बीमा योजना, सुरक्षा बीमा योजना आणि मिशन इंद्रधनुष्य अशा ७ केंद्रीय योजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत.
२२२ गावे झाली जलयुक्त
गावांची निवड करताना तयार केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातर्ंगत पाण्याच्या ताळेबंदानुसार टप्पा क्र.२ मधील (२०१६-१७) जिल्ह्यातील सर्व २२२ गावे जलयुक्त झाली आहे. त्यात जामनेर तालुक्यातील सर्वाधिक २६ गावे, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा तालुक्यातील प्रत्येकी २० गावांचा समावेश आहे.
४ हजार ८४३ कामे पूर्ण
जलयुक्त शिवार अभियानातर्ंगत दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्यातील २२२ गावांची निवड केली होती. या अभियानातर्ंगत विविध यंत्रणामार्फत ४ हजार ८५६ कामांचे नियोजन केले होते. त्यापैकी ४ हजार ८४३ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर आतापर्यंत १२४ कोटी ७६ लाख रुपये खर्च झाला आहे. उर्वरित कामे वन विभागाच्या परवानगीअभावी प्रलंबित होती.
जिल्ह्याला २ कोटी १६ लाखाचा निधी
राज्यात शाश्वत सिंचन वाढीसाठी सुरु करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातर्ंगत जिल्ह्याला २ कोटी १६ लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर आणि पारोळा या तालुक्यांना प्रत्येकी २० लाख रुपये, जळगाव, धरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ आणि एरंडोल या तालुक्यांना प्रत्येकी १० लाख रुपये तर चोपडा, रावेर, यावल या तालुक्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
४२ लाख ४३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेतर्ंगत यावर्षी १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्याला ४२ लाख ४३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी ते ज्या ठिकाणी वृक्ष लागवड करणार आहे. त्या ठिकाणाची (लॅण्ड बॅकेची) माहिती वन विभागाला तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.
जागा उपलब्धीसाठी
प्रयत्न सुरु
वृक्ष लागवड मोहिमेतर्ंगत झाडे लावण्यासाठी ज्या विभागांकडे स्वत:ची जागा उपलब्ध आहे. त्यांनी आतापासून खड्डे खोदण्याचे काम सुरु करुन ते पूर्ण करावे. ज्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याठिकाणांची माहिती वन विभागाला उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन त्यांना झाडे उपलब्ध करुन देणे सोईचे होईल. त्याचबरोबर ज्या विभागांना वृक्ष लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यांना बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जैन हिल्स येथे वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
महाश्रमदान दिनावर भर
१ मे रोजी महाश्रमदान दिन साजरा होईल. त्यात शहरातील नागरिकांना सहभागी करुन घेण्याचा उद्देश आहे. त्यासाठी जलमित्रसारखा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. राज्यातील ७५ तालुक्यात श्रमदान केले जाईल. याकरिता नागरिकांनी दुष्काळमुक्त राज्यासाठी आखलेल्या जलमित्र मोहिमेत लाखोंवर नागरिकांनी नोंदणी केली आहे.
५० पेक्षा अधिक गावे सहभागी
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील पारोळा आणि अमळनेर या दोन्ही तालुक्यांची निवड झाली आहे. स्पर्धेत ५० पेक्षा अधिक गावे सहभागी झाली आहेत. स्पर्धेचा शुभारंभ ८ एप्रिलला नगाव खु. येथे तर २२ एप्रिल रोजी कळमसरे, जवखेडा आणि पाडळसरे या गावांमध्ये श्रमदान केले आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@