अज्ञात कंटेनरची कारला धडक कारचालक जागीच ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |

 
 
भुसावळ :
भुसावळकडून वरणगावकडे जाणार्‍या स्वीप्ट डिझायर कारला समोरुन येणार्‍या अज्ञात भरधाव कंटेनरने धडक दिल्याने कार चालकाचा जागीच ठार झाल्याची घटना येथील आशिया महामार्ग क्र.४६ वरील हॉटेल चाहेल पंजाबनजीक असलेल्या विघ्नहर्ता स्टिल फर्निचर कारखान्यासमोर दुपारच्या सुमारास घडली. घटनास्थळावरुन कंटेनर चालक कंटेनरसह फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
 
रावेर तालुक्यातील रावेर येथील पाटीलपुरा भागातील रहिवासी संजय प्रल्हाद सरोदे (५२) हे २७ एप्रिल १८ रोजी दुपारी भुसावळ येथून वरणगावकडेे स्वीप्ट डिझायर कारने (क्र.एमएच -१९ सीएफ १४०९) जात असतांना आशिया महामार्गावरील वरणगाव रोड व्ही पॉईंटवरील विघ्नहर्ता स्टील फर्निचर कारखान्यासमोर दुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात कंटेनर चालकाने कंटेनरने स्वीप्ट डिझायरला धडक मारली. त्यात संजय सरोदे यांच्या छाती आणि कपाळावर मार बसून ते जागीच ठार झाले. या धडकेत कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला.
 
 
घटनेची माहिती बाजारपेठ पो.स्टे.ला कळताच पो.नि. चंद्रकांत सरोदे, पोलीस उपनिरिक्षक निशिकांत जोशी, हे.कॉं. देवानंद मगरे, वाल्मिक सोनवणे, सुधीर विसपुते यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रूग्णालयात रवाना केला.
 
 
याबाबत बाजारपेठ पो.स्टे.ला मनोज पुंडलिक सरोदे (रा.हुडको कॉलनी, भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास हे.कॉं. देवानंद मगरे करीत आहे.
@@AUTHORINFO_V1@@