घरकामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |

 
जळगाव :
जिल्ह्यातील घरकामगार व असंघटित कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी खान्देश कामगार संलग्न महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवार २७ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात १०० ते १२० महिला सहभागी झाल्या होत्या.
 
 
त्यात त्यांनी विविध मागण्यांचा प्रस्ताव मांडला. त्यात घरकामगारांना वृद्धपकाळात सन्मानाने जगण्याकरिता वयाच्या ५५ वर्षापासून पेन्शनची तरतूद करून दरमहा दोन हजार रुपये पेन्शन द्यावी, घरकामांना वेतन दर निश्‍चित करावा, किमान वेतन कायद्याच्या कक्षेत त्यांचा समावेश करावा, घरकामगारांच्या कल्याण मंडळाकरिता भरीव आर्थिक तरतूद करावी, कष्टकरी घरकामगारांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात यावे, शहरातील व नशिराबाद येथील प्राधान्य गटात समावेश न झालेल्या कष्टकर्‍यांचा प्राधान्य गटात समावेश करावा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला, अशी माहिती आयोजकांनी दिली. या संदर्भातील पत्रकावर कोषाध्यक्ष कॉ. हिमंत बोरसे, सरचिटणीस विकास अळवणी, अध्यक्ष वैशाली अळवणी, कविता सपकाळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@