उत्तर आणि दक्षिण कोरियाची ऐतिहासिक भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |



सियोल : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने आज दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जई इन यांची द.कोरियामध्ये जाऊन भेट घेतली आहे. तसेच गेल्या ६५ वर्षांपासून सुरु असलेले कोरियन युद्ध आजपासून समाप्त असून या पुढे दोन्ही देश एकमेकांच्या विकासासाठी सातत्यने प्रयत्न करतील, अशी घोषणा देखील दोन्ही नेत्याकडून करण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उत्तर कोरियाचा नेता द.कोरियाच्या भूमीत आल्यामुळे दोन्ही देशांसाठी हा ऐतिहासिक असा क्षण आहे.

उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅनमूनजोम याठिकाणी आज या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या रेषेच्या एका बाजूला उत्तर कोरियाची तर दुसऱ्या बाजूला दक्षिण कोरियाची भूमी असल्यामुळे हा भाग दोन्ही देशांसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. याठिकाणी आज सकाळी किम जोंग उन याने प्रथम दक्षिण कोरियाच्या भूमीत येऊन मून यांची भेट घेतली. तसेच त्यानंतर मून यांना उत्तर कोरियाच्या भूमीत नेऊन त्याठिकाणी पुन्हा एकदा त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यावेळी माध्यमांनी देखील मोठ्या उत्साहाने या ऐतिहासिक क्षणाचे चित्रण केले.

यानंतर किम आणि मून हे या दोघांमध्ये काही वेळासाठी चर्चा झाली. यामध्ये कोरियन द्वीपकल्पामध्ये शांतता प्रस्थापित करणे, दोन्ही देशांचा विकास, त्यांची मैत्री आणि अणु चाचण्या याविषयी चर्चा करण्यात आली. याला दोन्ही नेत्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेले कोरियन युद्ध आज समाप्त होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. याच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन्ही नेत्याकडून याठिकाणी एका वृक्षाचे रोप देखील लावण्यात आले आहे. तसेच या पुढे परस्परांच्या विकासासाठी एकमेकांना आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याचे आश्वासन त्यांनी एकमेकांना दिले आहे.





अमेरिका आणि सोव्हिएत रशियाने कोरियाचे विभाजन केल्यानंतर गेल्या ७० वर्षांच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदाच उत्तर कोरियाच्या हुकुमशहाने दक्षिण कोरियाच्या भूमीवर पाऊल ठेवले आहे. तसेच दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती देखील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून उत्तर कोरियाच्या सीमेच्या आत जाऊन आले आहेत. त्यामुळे ही घटना दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक अशी मानली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@