लंडन : विजय माल्यावरील पुढील सुनावणी ११ जुलैला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |


लंडन : कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटेनमध्ये लपून असलेला भारतीय उद्योजक विजय माल्या याच्यावरील पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होणार असल्याचे लंडन न्यायालयाने जाहीर केले आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्ट या न्यायालयाने आज या विषयी घोषणा केली असून येत्या ११ जुलैला माल्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सीबीआयने दाखल केलेल्या सर्व पुराव्यांची आणि कागदपत्रांची पाहणी करून यावर पुढील सुनावणी जुलै महिन्यात करण्यात येणार असल्याचे न्यायाधीश एमा अर्बूटनोट यांनी जाहीर केले. तसेच तोपर्यंत माल्याला ब्रिटेन बाहेर जाता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सीबीआयने दाखल केलेल्या सर्व पुराव्यांची पुन्हा एकदा पाहणी करण्यात येईल, तसेच सीबीआयला याविषयी आणखी काही कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्याची असल्यास त्यांनी ते ११ जुलैच्या आत न्यायालयात दाखल करावेत, असे निर्देश देखील त्यांनी दिले.
@@AUTHORINFO_V1@@